सातारा : कान्हरवाडीत बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

वडूज  दि. 5 (प्रतिनिधी)
कान्हरवाडी ता. खटाव येथे दि. 3 रोजी बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. कान्हरवाडी येथे दि. 3 रोजी गावातील देवीची जत्रा होती.

त्या जत्रेत सुरेश येलमार हे रात्री 8 च्या सुमारास गेले होते. त्यानंतर ते रात्री साडे नऊच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी घरात जात पाहणी केली. तेव्हा घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने असा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सुरेश येलमार यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चोरीचा तपास सहा. फौजदार दोलताडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)