“कान्स’मध्ये पहिल्यांदाच दिसणार बॉलीवुड क्‍वीन कंगणा

कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत झळकणार असून या आंतरराष्ट्रीय सोहळ्यामध्ये ती पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. ऐश्‍वर्या राय-बच्चन, दीपिका, सोनम कपूर, मल्लिका शेरावत यांनी यांनी रेड कार्पेटवर भारताचे प्रतिनिधित्व करत महोत्सवात रंगत आणली आहे. मात्र, यंदाच्या वेळी त्यांच्यासोबत हिमाचलची ब्यू कंगनाही रेड कार्पेट शेअर करणार आहे.

चित्रपट अवॉर्ड शो आणि महोत्सवापासून सतत लांब असणारी कंगना 8 ते 19 मे दरम्यान होणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी फारच उत्सुक असल्याचे दिसत आहे. कंगना या सोहळ्याला ग्रे गुस या लक्‍झरी लिकर ब्रॅंडच्या मदतीने उपस्थित राहणार आहे. कंगना शिवाय दीपिका पादुकोणही या महोत्सवात सहभागी होण्याची शक्‍यता आहे.

भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेली नवी ओळख पाहून मी फारच भारावून गेली असल्याचे कंगनाने म्हटले आहे. आपल्या अनेक वादग्रस्त विधानांमुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या आगामी “मणिकर्णिका’ चित्रपटाच्या चित्रकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट महाराणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत आहे.
दरम्यान, या महोत्सवात प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री आणि निर्माता नंदिता दास यांचा “मंटो’ चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)