कानिफा ऑटोमोटिव्हच्या “ई-मॅक्‍स’ रिक्षाचे लॉन्चिंग

मेक इन इंडिया अंतर्गत नगरच्या उद्योजकांची निर्मिती

नगर: एमआयडीसीतील कानिफा ऑटोमोटिव्ह प्रा.लि. कंपनीने मेक इन इंडिया अंतर्गत बॅटरीवर चालणारी ई-मॅक्‍स रिक्षाची निर्मिती केली आहे. गाडीचे संपुर्ण डिझाईन, बांधणी, डेव्हलपमेंट कंपनीतच होत आहे. ए.आर.ए.आय. प्रमाणित या ई-मॅक्‍स रिक्षाचे लॉन्चिंग रविवार दि.6 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हॉटेल यश ग्रॅण्ड येथे होईल, अशी माहिती कंपनीचे संचालक राहुल डाडर अशोक गोरखे, प्रथमेश जगधने यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रसंगी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, खा.दिलीप गांधी, जि.प.अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, आ.अरुण जगताप, आ.शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मा.आ.जगन्नाथ शेवाळे (पुणे), आ.राहुल कुल (दौंड), मा.आ.रमेश थोरात (दौंड), जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पूज्य सुदाम गोरखे गुरुजी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कंपनीचे डायरेक्‍टर राहुल डाडर, अशोक गोरखे, प्रथमेश जगधने यांनी काळाची पावले ओळखून बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीचे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे. ई-मॅक्‍स रिक्षा 100 टक्के प्रदूषण मुक्त आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ती 100 कि.मी.पर्यंत चालते. चार्जिंगसाठी प्रति कि.मी.फक्त 40 पैसे खर्च येतो. चालक व 4 प्रवासी अशी एकूण 5 आसन क्षमता करण्यात आली आहे.

एक्‍साईडची दर्जेदार बॅटरी, मजबूत चासी ई-मॅक्‍सचे वैशिष्ट्‌य आहे. कानिफा ऑटोमोटिव्हचे संचालक राहुल डाडर यांच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील 14 वर्षांच्या अनुभवातून या बॅटरीवर चालणाऱ्या गाडीची संकल्पना पुढे आली. कमीत कमी किंमतीत आकर्षक डिझाईन, सर्वोत्तम गुणवत्ता, दर्जेदारपणा, समाधानकारक प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयतक्‍ करण्यात आला आहे. अशोक गोरखे यांनी मार्केटिंगमधील अनुभवातून ई-मॅक्‍स रिक्षा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी मार्केटिंग रणनीती तयार केली आहे. प्रथमेश जगधने हे कंपनी व्यवस्थापनाची धुरा अतिशय नियोजनपूर्वक सांभाळून गाडीच्या निर्मितीत योगदान देत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)