कानाच्या पडद्यावर बिनटाक्‍याची शस्त्रक्रिया

पिंपरी – चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयात एका रुग्णावर कानाच्या पडद्यावरील बिनटाक्‍याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. या प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा कान, नाक, घसा रोग तज्ज्ञ डॉ. सुरज गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गिरी म्हणाले, पिंपरी येथील पन्नास वर्ष वय असलेल्या महिलेला गेल्या तीन वर्षापासून कानाचा त्रास होत होता. कानात मळ साचत असल्याने तो दुखत असल्याचे काहींनी सांगितल्याने त्यांनी दुखण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, या आजारावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. ही शस्त्रक्रिया बिनटाक्‍याची असून “मिनिमल इन्व्हेसिव्ह’ स्वरुपातील तंत्रज्ञान वापरुन शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या कानावर कोणतेही बॅण्डेज पट्टी लावण्यात आली नसून कानाच्या आकारात कोणताही बदल झालेला नाही. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची अत्यंत जलद सुधारणा होत असून व्यवस्थितपणे ऐकू येत आहे. तसेच, अनेकजण कान दुखत असताना गैरसमजातून विविध वस्तूंनी कान टोकरणे, गरम तेल टाकणे, औषधी थेंब टाकतात. कानाच्या आजाराकडे अनेक रुग्ण दुर्लक्ष करणे धोकादायक असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)