संग्रहित छायाचित्र

चाकण- चाकण बाजारात कांद्याची आवक घटून भाव मात्र किरकोळीत उतरले. बटाटा आवक घटून भावही उतरले. हिरवी मिरची आवक वाढली व भावही वाढले. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 50 लाख रुपये झाली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक 2015 क्विंटलने घटून मागील आठवड्याच्या तुलनेत भावात 11 रुपयाने घट झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 3585 क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात 11 रुपयांनी घट झाली. कांद्याचा कमाल भाव 811 रूपयांवरून 800 रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1300 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 170 क्विंटलने घटली बटाट्याचा कमाल भाव 1400 रुपये झाला. भुईमूग शेंगाची (जळगाव) एकूण आवक 10 क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव 5300 रुपयांवर स्थिर झाला. लसणाची एकूण आवक 15 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 460 पोती झाली.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 5 लाख 15 हजार जुड्यांची आवक होऊन 500 ते 2250 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 4 लाख 47 हजार जुड्यांची आवक होऊन 500 ते 1800 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक 70 हजार जुड्या झाली. 300 ते 900 असा जुड्यांना भाव मिळाला .
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा :
क्रमांक एक : 800
क्रमांक दोन : 650
क्रमांक तीन : 400
एकूण आवक : 3585 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1400
क्रमांक दोन : 1300
क्रमांक तीन : 1200
एकूण आवक : 1300 क्विंटल
भुईमूग (जळगाव)
क्रमांक एक : 5300
क्रमांक दोन : 5000
क्रमांक तीन : 4500
एकूण आवक : 10 क्विंटल
लसूण :
क्रमांक एक : 2500
क्रमांक दोन : 2000
क्रमांक तीन : 1800
एकूण आवक : 15 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागाना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 995 पेट्या (300 ते 600), कोबी : 292 पोती (200 ते 400), फ्लॉवर : 325 पोती (800 ते 1200),वांगी : 345 पोती (800 ते 1200), भेंडी : 480 पोती (1000 ते 2500), दोडका : 315 पोती (1000 ते 2000), कारली : 240 डाग (1500 ते 2500), दुधीभोपळा : 225 पोती (500 ते 1000), काकडी : 260 पोती (500 ते 1200), फरशी : 80 पोती (2000 ते 3000), वालवड : 215 पोती (2500 ते 4500), गवार : 180 पोती (2500 ते 3500), ढोबळी मिरची : 520 डाग (1000 ते 2000), चवळी : 60 पोती (2500 ते 3500), वाटाणा : 70 पोती (5000 ते 6000), शेवगा : 115 डाग (1500 ते 2500), गाजर : 40 डाग (800 ते 1400).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 12720 जुड्या (500 ते 1000), कोथिंबीर : एकूण आवक : 18970 जुड्या (500 ते 1000), शेपू : एकूण आवक : 4560 जुड्या (400 ते 700), पालक : एकूण आवक : 3450 जुड्या (300 ते 500).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 95 जर्शी गायींपैकी 30 गाईची विक्री झाली (10 ते 40 हजार रुपये), 155 बैलांपैकी 75 बैलांची विक्री झाली (15 ते 25 हजार रुपये), 90 म्हशींपैकी 55 म्हशींची विक्री झाली (20 ते 60 हजार रुपये), शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 8960 शेळ्या-मेंढ्यापैकी 8250 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1200 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 90 लाखांची उलाढाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)