काद्यांची आवक वाढली; भाव उतरले

चाकण- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा आवक वाढली तर बटाटा आवक गेल्या शनिवारच्या तुलनेत स्थिर राहिली. भूईमुग शेंगा, लसणाची आवक वाढली. तर कांदा, भूईमुग शेंग, लसणाचे भाव उतरले, तर बटाट्याचे भाव स्थिर राहिले. राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात पालेभाज्यांची आवक कमी झाली. याही आठवड्यात शेलपिंपळगाव उपबाजारात भाज्यांची आवक घसरली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात पालक, शेपूची आवक वाढली तर कोथिंबीर, मेथीची, आवक कमी झाली. जनावरांच्या बाजारात गाई, म्हशींच्या संख्येत वाढ झाली. बैल, शेळ्या-मेंढ्या, बोकड यांच्या संख्येत घट झाली. जनावरांच्या बाजारात एकूण उलाढाल 3 ते 4 कोटी रुपयांच्या आसपास झाली. या आठवड्यात उलाढाल वाढली. एकूण उलाढाल 4 कोटी 50 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 720 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 85 क्विंटलने वाढली भाव 2100 रुपयांवरुन 1800 रुपये झाले. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1100 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 850 क्विंटलने घटली व कमाल भाव 700 रुपयांवर स्थिर झाले.लसणाची एकूण आवक 14 क्विंटल झाली या आठवड्यात 2 क्विंटल ने वाढ झाली. कमाल भाव मात्र 500 रुपयाने कमी होऊन 4500 रुपयांवर आले. भूईमुग शेंग 21 क्विंटल झाली ती या आठवड्यात 5 क्विंटल ने वाढली व भाव 500 रुपयाने घटून 5000 रुपये झाले.
हिरव्या मिरचीची एकूण आवक 265 क्विंटल झाली. भावात घट झाली. हिरव्या मिरचीला 1500 ते 2500 रूपये असा कमाल भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 1800
क्रमांक दोन : 1500
क्रमांक तीन : 1000
एकूण आवक – 720 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 700
क्रमांक दोन : 600
क्रमांक तीन : 400
एकूण आवक – 1100 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 4500
क्रमांक दोन : 4000
क्रमांक तीन : 3000
एकूण आवक 14 क्विंटल
भूईमुग
क्रमांक एक : 5000
क्रमांक दोन : 4000
क्रमांक तीन : 3000
एकूण आवक 21 क्विंटल
फळभाज्या : 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 625 पेट्या (2000 ते 3500), कोबी : 245 (400 ते 800), फ्लॉवर : 225 पोती (400 ते 1000), वांगी : 385 पोती (1500 ते 3500), भेंडी : 286 पोती (2000 ते 3000), दोडका : 205 (1000 ते 2000), कारली : 320 डाग (1000 ते 2000), दुधीभोपळा : 75 पोती (1500 ते 2500), काकडी : 205 पोती (500 ते 1000 ), गवार : 95 पोती (2500 ते 3500), फरस बी 95 : (800 ते 1200), ढोबळी मिरची : 320 (1000 ते 2000), वालवर : 110 (2000 ते 3000), शेवगा : 25 पोती (3000 ते 5000), चवळी 85 (1000ते 2000), वाटाणा : 130 (2000 ते 3000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 5 हजार 800 जुड्या (800 ते 1000 ), कोथिंबीर : एकूण आवक : 6 हजार 850 जुड्या (1000 ते 1500), शेपू : एकूण आवक : 1 हजार 850 जुड्या, (600 ते 800) पालक : एकूण आवक : 2 हजार 500 जुड्या ( 400 ते 600).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 65 जर्शी गायींपैकी 32 गायांची विक्री झाली. (15 ते 35 हजार रुपये), 180 बैलांपैकी 110 बैलांची विक्री झाली. (10 ते 25 हजार रुपये), 210 म्हशींपैकी 120 म्हशींची विक्री झाली
(20 ते 60 हजार रुपये), 4300 शेळ्या-मेंढ्यांपैकी 3700 शेळ्यां – मेंढ्यांची विक्री झाली. (3 ते 15 हजार रुपये) 6453 बोकड पैकी 5300 (5ते 20 हजार) रुपये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)