कादर खान यांच्या निधनानंतर स्मृती इराणींची भावनिक पोस्ट

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे आज निधन झाले. कॅनडामधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कादर खान यांचा मुलगा सरफराज खानने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  कादर खान यांचे पार्थिव भारतात आणणार नसून कॅनडामध्येच त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. कादर खान यांच्या निधनाने बॉलिवूडसह राजकीय नेते आणि त्यांचे चाहतेही हळहळले आहेत.

कादर खान यांच्या निधनाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी भावुक झाल्या असून त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहली आहे. ‘जर तुम्ही ८०-९०च्या दशकात कादर खानसाहेब यांना पहिले असेल तर तुम्हांला त्यांच्या विनोदाची जादू नक्कीच माहिती असेल. मी कादर खानसाहेब यांना कधीच भेटले नाही. परंतु मी भेटले असते तर त्यांना नक्कीच हसविण्यासाठी धन्यवाद म्हंटले असते, असे ट्विट त्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)