कात्रज प्राणी संग्रहालयात सीसीटीव्ही वाढणार

आणखी 28 उपकरणे बसविण्याचा निर्णय

पुणे – कात्रज येथील भारतरत्न राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वारंवार होणाऱ्या चंदन चोरी, घुसखोरी तसेच अतिउत्साही पर्यंटकांवर लक्ष ठेवण्यासाठी प्राणी संग्रहालयात आणखी 28 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. या उद्यानात या पूर्वीच 36 सीसीटीव्ही आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आवश्‍यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-

कात्रज उद्यानात लावण्यात येणारे सर्व कॅमेरे नाईट व्हिजनचे असतील. त्यासाठी 22 लाख रुपयांचा खर्च होणार आहे. कात्रज प्राणीसंग्रहालय 165 एकरात विस्तारलेले असून जवळपास 3,350 प्रकारचे प्राणी येथे आहेत. उद्यानात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असते. रात्रीच्या गस्तीठीही येथे सुमारे 30 सुरक्षा रक्षक तैनात असतात. मात्र, उद्यानाचे क्षेत्रफळ पाहता त्यांना सर्वत्र तपासणी अशक्‍य होते. त्यामुळे आता सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे 36 सीसीटीव्ही बसविले आहेत. उर्वरित भागांवर लक्ष ठेवणे आणखी 28 सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.

लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
या सीसीटीव्हींचे चित्रीकरण संपूर्ण रात्रभर पाहण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. यामुळे उद्यानातील हालचाली समजण्यास मदत होऊन सुरक्षा रक्षकांना तातडीने उपाय शक्‍य होणार आहेत. सुरक्षा रक्षक प्रत्येक 1 ते दीड तासानंतर उद्यानाची फेरी मारतात. मात्र, त्यानंतर त्याच जागेवर पुन्हा जाण्यासाठी तितकाच वेळ जातो. त्यामुळे एक पथक संपूर्ण रात्रभर या सीसीटीव्हींच्या चित्रीकरणावर नजर ठेऊन असणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)