कात्रज प्राणीसंग्रहालयाचे शुल्क वाढणार

प्रौढ व्यक्‍तींसाठी आता 40 रुपये लागणार

पुणे – कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात प्रौढ व्यक्‍तींसाठीचे प्रवेश शुल्क आता 40 रुपये लागणार आहे. प्रशासनाने ठेवलेल्या शुल्कवाढीच्या प्रस्तावास गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली पत्रकार परिषदेत दिली.

प्रशासनाने हे शुल्क 25 रुपयांवरून दुप्पट करत 50 रूपये करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, समिती सदस्यांनी उपसूचना देत हे शुल्क 50 ऐवजी 40 रूपये करण्यास मान्यता दिली आहे.

कात्रज येथील 130 एकर जागेत प्राणी प्रजोत्पनासाठी आणि वन्यजीव संवर्धन शिक्षण व संशोधन करण्यासाठी नैसर्गिक आभासाचे स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय विकसित करण्यात आले आहे. यात वाघ, हत्ती, हरीण, माकड, अस्वल अशा प्राणी आणि पक्ष्यांचा समावेश आहे. पर्यटकांसाठी बॅटरी ऑपरेटेड वाहनाची सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. या प्राणिसंग्रहालयाचे सध्याचे प्रवेश शुल्क यापूर्वी 13 ऑक्‍टोबर 2015 मध्ये वाढविण्यात आले होते. त्यातच प्राणी संग्राहालयाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. आहे. प्राण्यांची संख्या आणि दिल्या जाणाऱ्या सुविधांचा विचार करता सध्याच्या शुल्कात वाढ करणे आवश्‍यक असल्याचे मत प्राणिसंग्रहालय सल्लागार समितीने दिले होते.

वार्षिक खर्चात सेवकांचे वेतन, प्राण्यांचे खाद्य, औषधे, खंदक देखभाल व दुरूस्ती यावर मोठा खर्च होतो. नियोजित मास्टर प्लॅनमध्ये खंदक निर्मिती, नवीन सर्पोद्यान निर्मिती, जलचर पक्ष्यांसाठी अद्ययावत पिंजरे, प्राणी प्रजनन केंद्र, निसर्ग निर्वचन केंद्र आदी विकास कामे प्रस्तावित असून त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी प्रवेश शुल्क वाढविणे आवश्‍यक असल्याचे सल्लागार समितीने सुचविले होते. त्यानुसार, समितीने या दरवाढीस मान्यता दिली आहे.

पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होण्याची भीती
या शुल्कवाढीमुळे संग्रहालयाच्या पर्यटक संख्येवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. तीन व्यक्तींचे कुटूंब संग्रहालयास भेट देण्यासाठी गेल्या त्यांना आता मुल 5 वर्षांच्या आतील असल्यास जवळपास 90 रुपये मोजावे लागणार आहेत. तर या कुटुंबासोबत आजी-आजोबाही असल्यास त्यांना 170 रुपये मोजावे लागणार आहेत. उद्यानास भेट देणाऱ्या पर्यंटकांमध्ये सुमारे 70 टक्‍के पर्यटक हे प्रौढ व्यक्‍ती असून 30 टक्के मुले आहेत. त्यामुळे उद्यानात आल्यास पार्किंगसह तिकिट शुल्कापोटीच 100 रुपये मोजावे लागणार असल्याने पर्यंटकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होण्याचीही शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)