कात्रज घाटातील खोदाई प्रवाशांच्या मुळावर

दीड महिन्यांपासून डांबरीकरणाचे काम ठप्प 


कामात संथगती

कात्रज- पुणे- सातारा जुना कात्रज घाट रस्त्यावरील खड्डयांमुळे झालेली रस्त्याची दुरवस्था, राडारोडा व कचऱ्याने तुंबलेली पावसाळी लाईन, तुटलेल्या अवस्थेतील सरंक्षक कठडे आदी समस्यांचा डोंगर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रश्‍न जटील होत आहेत. नागरिकांच्या तक्रारीमुळे जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेतले होते. मात्र, तेही अर्धवट स्थितीत असल्यामुळे बांधकाम विभाग नागरिकांच्या रोषाला सामोरे जात आहे.

कात्रज जुना घाट रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम गेली दीड महिना बंद आहे. तसेच खोदून ठेवलेल्या पावसाळी लाईनमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. जानेवारी 2018 या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पावसाळी लाईनची खोदाई केली. मात्र, ही खोदाई सुमारे पाच ते सहा फुटापर्यंत करण्यात आली असून त्यासाठी कसलीही सुरक्षा व्यवस्था नाही.

साध्या सुरक्षा पाट्या, बॅरिगेटस लावण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना अंदाज न आल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, त्याची तसुभरही चिंता बांधकाम विभागाला नाही का, असा सवाल जाणकार उपस्थित करत आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दक्षिण विभाग कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

मनपा हद्द ते भिलारेवाडी या रस्त्याच्या डांबरीकरण कामापैकी अर्ध्याच रस्त्याचे ग्राउटींग करण्यात आले असून त्यावरील अंतिम डांबरीकरण केंव्हा होणार तसेच उर्वरित रस्त्याचे काम केव्हा होणार, असा सवाल उपस्थित केला आहे. दीड महिन्यांपासून हे काम बंद असून ते काम तत्काळ सुरू करावे. पावसाळी लाईन खोदलेल्या गटारांसाठी सुरक्षक यंत्रणा उभारावी, अशी मागणी यावेळी मांगडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)