कात्रज उद्यानातील सैर महागणार

प्रौढांसाठी दुप्पट शुल्क वाढणार : उद्यानाचा खर्च वाढल्याने पालिकेचा निर्णय

पुणे – कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. उद्यान येणाऱ्या 4 फूट 4 इंचापेक्षा अधिक उंची असलेल्या (प्रौढ) व्यक्तींना सध्या 25 रुपयांचे प्रवेश शुल्क आहे. हे वाढवून 50 रुपये करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील प्राणी संग्रहालय सल्लागार समितीच्या बैठकीत ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर इतर कोणत्याही प्रवेश शुल्कात समितीने वाढ सूचविलेली नाही. दरम्यान, या उद्यानास दरवर्षी सुमारे 3 लाखांहून अधिक पर्यटक भेट देत असून त्यात प्रौंढ व्यक्तींची संख़्या 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाने सांगितले.

कात्रज येथील हे प्राणी संग्रहालय असून यापूर्वी 2015 मध्ये या उद्यानाच्या प्रवेश शुल्कात वाढ झालेली आहे. त्यातच, प्राणी संग्रहालयात दाखविण्यात येणारे प्राणी, त्यांच्यासाठी अत्यावश्‍यक सुविधा, उद्यान व्यवस्थापन, त्याची देखभाल दुरूस्ती यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असून होणाऱ्या खर्चापेक्षा मिळणारे उत्पन्न अतिशय कमी आहे. त्यातच प्राणी संग्रहालयाचा “मास्टर प्लॅन’ तयार करण्याचे काम सुरू असून सिंह, शेकरू, रानमांजरे, रान कुत्री यांच्यासाठी खंदक, नवीन सर्पोद्यान, जलचर पक्षांसाठी अद्ययावत पिंजरा निर्मिती, प्राणी प्रजनन केंद्र, निसर्ग माहिती केंद्राचे उर्वरित काम यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. त्यामुळे उद्यानाच्या प्रवेश शुल्क वाढ करणे आवश्‍यक असल्याचा निर्णय सल्लागार समितीने घेतला आहे. त्यातच देशातील इतर संग्रहालयांच्या तुलनेत कात्रज उद्यानाचे प्रवेश शुल्क अतिशय कमी असल्याने भविष्यातील विकास खर्च पाहता ही शुल्कवाढ अपरिहार्य असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.

इतर शुल्कात वाढ नाही
प्रशासनाने केवळ 4 फुटांपेक्षा अधिक उंची असलेल्या (प्रौढ) व्यक्तींसाठीच ही प्रवेश शुल्क दरवाढ 25 वरून 50 करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बॅटरी ऑपरेटेड वाहनाचे शुल्क 40 वरून 50 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी 3 वर्षांखालील मुलांसाठी मोफत तर 4 फुटांपेक्षा कमी उंची असलेल्या मुलांना 10 रुपये, विदेशी नागरिकांना 100 रुपये, अंध, अपंगांना मोफत, खासगी शाळांच्या मुलांना 10 रुपये, पालिका शाळांच्या मुलांना 5 रुपये, स्टिल कॅमेरा फोटो शुटसाठी 50 रुपये, व्हिडिओ चित्रिकरणासाठी 200, तर गाईडसाठीचे 50 रुपयांचे शुल्क कायम ठेवत दिलासा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)