काढू नका गर्भाशय.. ( भाग २)

काढू नका गर्भाशय.. ( भाग १ )

समजा, फॅब्रॉईडची एकच गाठ असेल तर दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून गाठ काढता येते. हार्मोन्सचे इंजेक्‍शन देऊनही गाठ कमी करता येतात. रक्तस्राव अनियमित व अतिजास्त असेल तर हार्मोन्स ट्रीटमेंट, डायलेटेशन अँड क्‍युरेटाज, मिरेना हे कॉपर टी सारखे उपकरण बसवणे हे उपाय करता येतात. ऍन्ड्रोमेट्रायससीसवरही हार्मोन्स थेरपी व दुर्बिणीतून शस्त्रक्रिया हे उपाय आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिशवी हलल्यावरही दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून उपचार करता येतात. या सर्व आजारात पिशवी काढण्याची अपरिहार्यता अनेकदा असतच नाही. कर्करोग लवकर कळला तर लवकर उपाय करता येतात. यासाठी पॅपस्मियर, कॉलपोस्कोपी या टेस्ट करून घ्याव्यात. कर्करोगाच्या पेशी आढळल्या तर कॉटरिनद्वारे या पेशी जाळता येतात किंवा क्रायो पद्धतीचा उपचार करून अत्यंत थंड तापमान देऊन त्या नष्ट करता येतात. त्याचप्रमाणे सर्जिकली लीप म्हणजे पूर्ण पिशवी न काढता थोडासाच भाग काढून टाकता येतो. कोनायझेशन या शस्त्रक्रियेतून पिशवीच्या मुखाचा त्रिकोणाकृती भाग काढला जातो म्हणजे होता होईतो प्रत्येक आजारात पिशवी वाचवता येते आणि ती वाचवली पाहिजे.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला जरूर घ्यावा. अनेक वेळा रुग्णांचा डॉक्‍टरांवर खूप विश्‍वास असतो; पण प्रत्येक वेळी डॉक्‍टरकडे अत्याधुनिक शस्त्रक्रियेचे कौशल्य असेलच असे नाही. अनेक जण केवळ ओळखीच्या डॉक्‍टरने सांगितले म्हणून विश्‍वास ठेवतात. त्यापेक्षा आपल्या डॉक्‍टरांविषयी आदर ठेवूनही दुसऱ्या तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्यावा. कारण त्या निर्णयाने होणारे परिणाम महिलेला भोगायचे असतात. आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे. त्यासाठी अधिक जबाबदारीने निर्णय घेतला पाहिजे. आपल्याला झालेल्या विकाराविषयी व त्याच्यावरील उपचारांविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवूनच उपचारांचा निर्णय घेतला पाहिजे.

महिलांची हाडे पुरुषांच्या तुलनेत कमकुवत असतात. त्यातच चाळिशीनंतर ती अधिक कमकुवत होतात. त्यातून गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी हे हाडांशी संबंधित विकार जडतात. महिलांनी आहारातून कॅल्शिअमचे प्रमाण जास्त घेतले, तर या विकारांपासून दूर राहता येईल.

दूध, दही, ताक, सोया, पनीर यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. सोया पनीरमध्ये फॅटचे प्रमाण इतर पनीरपेक्षा कमी असते. त्यामुळे शक्‍यतो सोया पनीर खावे. नाचणी, कडधान्ये, अळशी यामध्येही कॅल्शिअमचे प्रमाण चांगले असते. नाश्‍त्यामध्ये या घटकांचा वापर करता येईल. नाचणीची भाकरी किंवा इतर अनेक पदार्थही करता येतात. त्याचबरोबर जिरा, बडीशेप, शेपा यामध्येही कॅल्शिअम आहे. तीळ, बडीशेप, शेपा, ओवा भाजून एकत्र करून ठेवल्यास जेवणानंतर मुखशुद्धी म्हणूनही खाता येते व कॅल्शिअमही मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)