काठेवाडी येथे शिक्षण परिषदेचे उत्साहात

ओतूर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठेवाडी (ता. जुन्नर) या येथे पंचायत समिती जुन्नर व केंद्र पिंपळगाव जोगा यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे शनिवीा (दि. 22) आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुंबरे, तसेच जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा.सुशीला डुंबरे, केंद्रप्रमुख सुरेश भवारी आणि केंद्रातील सर्व मान्यवर शिक्षक पात्र मुख्याध्यापक यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठेवाडीच्या वतीने मुख्याध्यापक शिंदे यांनी स्वागत केले. प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषणाचे नमुने सादर केले विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. त्यानंतर केंद्राचे केंद्रप्रमुख भवारी यांनी परिसर अभ्यास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले आणि गट कार्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पारवे यांनी केले आणि मुख्याध्यापिका शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)