काठापूर बुद्रुक तंटामुक्‍ती समिती अध्यक्षपदी करंडे

लाखणगाव-आंबेगाव तालुक्‍यातील काठापूर बुद्रुक येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवृत्ती बाबुराव करंडे तर उपाध्यक्षपदी रामदास नामदेव करंडे यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध संस्थाचे आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. काठापूर बुद्रुक येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रतिभा चाबुकस्वार, उपसरपंच कान्हु करंडे, अनिल जाधव, अशोक करंडे, रोहिदास तुळे, सोसायटीचे उपाध्यक्ष पांडुरंग करंडे, बाळासाहेब करंडे, बाबाजी करंडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जोरी, उल्हास करंडे, नरहरी करंडे, हनुमंत जाधव, सुभाष जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)