काठापूर बुद्रुकला उत्कृष्ट सोसायटी पुरस्कार

लाखणगाव -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक येथील काठापूर बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला आंबेगाव तालुक्‍यातील उत्कृष्ट सहकारी सोसायटी म्हणून प्रथम क्रमांकांचा पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
पुणे जिल्हा सहकारी बॅंकेची 100वी वार्षिक सर्वसाधारण सभा कमीन्स हॉल पुणे येथे नुकतीच पार पडली. यावेळी बॅंकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये आंबेगाव तालुक्‍यातील उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार काठापूर बुद्रुक विविध विकास सहकारी संस्थेला देण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते जिल्हा बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन जंगल जाधव, व्हाइस चेअरमन पांडुरंग करंडे, माजी चेअरमन रायचंद गांधी, संचालक बबन जाधव, विजय कुलकर्णी, विठ्ठल करंडे, मधुकर चाबुकस्वार, काळुराम करंडे, संगिता थोरात, अंजनाबाई ढमाले, दत्तात्रय करंडे, पुरूषोत्तम जोरी, सचिव पांडुरंग ढगे त्याचप्रमाणे जिल्हा बॅंक पारगाव शाखेचे अधिकारी यांनी पुरस्कार स्विकारला. उत्कृष्ट कामगिरी, चांगली वसुली यासारख्या गोष्टीमध्ये काठापुर बुद्रूक सोसायटी अग्रेसर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)