काटे व वजने मापे उपकरणे यांची खरेदी व दुरुस्ती परवानाधारकांकडून करावी

वैधमापन शास्त्र विभागाचे आवाहन
सातारा- सातारा जिल्ह्यामध्ये वजने मापे दुरुस्ती परवाना धारकांची संख्या 26 आहे तसेच वजने मापे विक्री परवाना धारकांची संख्या 35 आहे यामध्ये देखील काही परवाना धारकांकडे फक्त मेकॅनिकल वजन माप दुरुस्ती तसेच विक्री परवान आहे.

या वैध परवानधारकांकडूनच वजने मापे,काटे उपकरणे यांचे दुरुस्तीचे व विक्रीचे काम वजने मापे उपयोगकर्ता यांनी करुन घेणे उचित आहे, असे असून सुध्दा काही वजने मापे उपयोगकर्ते अनअधिकृत इसामांकडून आपल्या वापरात असलेल्या काटे व वजने मापे उपकरणे यांची दुरुस्ती करुन घेत असल्याबाबत निर्दशनास आले आहे. अशा प्रकारच्या अनुचित व्यापारी प्रथेबाबत संबंधीत उपयोगकर्ता तसेच अवैध दुरुस्ती व विक्री करणाऱ्या व्यक्ती यांना जबाबदार धरुन त्याच्यावरती वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अ) नियम 2011 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र सातारा यांनी कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)