काटेवाडी येथे 600 महिलांची आरोग्य तपासणी

भवानीनगर – काटेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून व सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान महावीर जयंती व जागतिक महिला दिननिमिताने काटेवाडी (ता. बारामती) येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचा 600 महिलांनी लाभ घेतला. काटेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज (गुरुवारी) हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डॉ. सुनील शहा, स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. मेधा शहा, फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ. संतोष चाकुरकर, होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. राकेश मेहता, दंत रोग तज्ज्ञ डॉ. धनंजय खताळ, काटेवाडी आरोग्यकेंद्र प्रमुख डॉ. मार्तंड जोरी यांनी ही तपासणी केली. तर शिबीर यशस्वी होण्यासाठी सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच गायकवाड, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोइटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले. यावेळी श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, एकनाथ काटे, के. टी. जाधव, ऍड. स्नेहा भापकर, पूनम मोहिते, मिलिंद काटे, बापुराव गायकवाड, अमर जगताप, दत्तात्रय काटे, उपस्थित होते.तत्पूर्वी बारामती येथील महिला रुग्णालयाचे डॉ. भोई यांनी सकळी या शिबीराला भेट दिली व भगवान महावीरांच्या प्रतिमा पुजानाने शिबिराची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राकेश मेहता, सूत्रसंचालन शीतल काट तर सरपंच विद्याधर काटे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)