काटेवाडी, भवानीनगरात “साहित्यरत्ना’सअभिवादन

भवानीनगर- काटेवाडी (ता.बारामती) येथील साठेनगर, भवानीनगर, अशोकनगर (ता.इंदापूर) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यत आले. काटेवाडी येथील साठेनगर येथे सरपंच विध्याधर काटे व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व इतर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी के. टी. जाधव, संजय काटे, अनिल काटे, प्रकाश काटे, महादेव कचरे, अनिल काटे, पोलीस पाटील सचिन मोरे, जितेंद्र काटे, राजेंद्र पवार, दत्तात्रय काटे, श्रीधर घुले, शितल काटे, राजु भिसे, समीर मुलाणी, अमर जगताप, धनंजय काळे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे आदी उपस्थित होते. के. टी. जाधव म्हणाले की, अण्णा भाऊ साठे हे अशिक्षित होते तरीही त्यांनी साहित्य निर्माण केले. तसेच 1944 मध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर गवाणकर यांनी लाल बावटा या कलापथकाची स्थापना केली. त्याद्वारे लावण्या, पोवाडे व वगनाट्य या माधमातून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ व गोवा मुक्ती आंदोलनात जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला होता. त्यांनी अनेक कादंबरी, कथासंग्रह, ग्रंथ लिहिले असल्याचे नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)