काटेवाडीत बिरोबा देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

तीन बाजूंनी जाता येत असून एकही रस्ता चांगला नाही

भवानीनगर- काटेवाडी (ता. बारामती) येथील पुरातनकालीन बिरोबा देवस्थान मंदिराकडे जाणारा रस्ता खराब झाला असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहन चालविताना अडचणी निर्माण होत आहेत.
या मंदिराकडे जाण्यासाठी कान्हेरी ते बिरोबा मंदिर, काटेवाडी ते बिरोबा मंदिर आणि भवानीनगर ते बिरोबा मंदिर असा तीनही बाजूंनी रस्ता आहे. मात्र, या तीनही बाजूंचा रस्ता खराब झालेला आहे. सध्या भाविक या मंदिराकडे जाण्यासाठी भवानीनगरवरून दीपनगरमार्गे जाणे पसंत करीत आहेत; परंतुया रस्त्याच्या कडेला नागरिकांनी अतिक्रमण करून अगदी रस्त्यालगत घरे बांधली आहेत, काही ठिकाणी या रस्त्याच्या कडेला उकिरडे तयार झाले आहेत तर काही ठिकाणी सरपणाचे ढीग नागरिकांनी रस्त्यावरच लावले आहेत, त्यामुळे येथून जाणाऱ्या भाविकांना हा रस्ता देखील अडचणीचा होत आहे.
हा रस्ता साधारण तीन ते चार कि. मी.चा असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. दर रविवारी बिरोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते, दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. राज्यातून अनेक भाविक येथे येतात. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि रस्त्याच्या कडेला नागरिकांनी केलेले अतिक्रमणही काढण्यात यावे, आशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.

  • काटेवाडी हद्दीतील रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, बिरोबा देवस्थानकडे जाणाऱ्या दीपनगरमार्गावर झालेले अतिक्रमण हे काटेवाडी आणि भवानीनगरच्या सीमेवर आहे. हा मार्ग इंदापूर आणि बारामती अशा दोन्ही तालुक्‍यांच्या हद्दीवर असल्याने याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने उपाययोजना करण्याची गरज आहे.
    – विद्याधर काटे, सरपंच, काटेवाडी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)