काटेवाडीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत

भवानीनगर – श्री संत तुकाराम महाराज पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला असून पालखी काटेवाडी येथे आली असता परंपरागत पद्धतीने पालखीचे स्वागत लोणकर परिवाराने मोठ्या भक्ती भावाने केले. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्यावेळी काटेवाडी गावात येताच येथील लोणकर कुटुंबाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात येते. ही सेवा लोणकर कुटुंब गेली 100 वर्ष करीत आहे. कै. बाबुराव गोविंद लोणकर यांनी पालखीची सेवा करता यावी या भावनेतून हि परंपरा सुरू केली. दोन दिवसांपूर्वी पालखी काटेवाडी येथे आली असता पालखीचे स्वागत विठ्ठल लोणकर, एकनाथ लोणकर, रामचंद्र लोणकर, प्रल्हाद लोणकर, विनायक लोणकर, संजय काटे यांनी केले. पाठ्यपूजा विठ्ठल लोणकर यांच्या हस्ते करण्यात आली. श्री संत तुकाराम महाराज पालखी काटेवाडी गावात आल्याने गावातील वातावरण भक्तीमय झाले होते. परिसरातील नागरिकांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)