रेडा- गोविंदा आला रे आला, राधे कृष्ण गोपाळ कृष्ण, गोविंदा रे गोपाला अशा घोषणा देत काटी (ता. इंदापूर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालगोपाळांनी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रथम दहीहंडीचे पूजन भाजपचे प्रदेश सदस्य सचिन आरडे, शाळा समिती अध्यक्ष वसंत भोसले, दादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालाजी वाघमारे, सोपान कांबळे, मिलिंद देटगे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी दहीहंडीभोवती रिंगण करीत आनंद लुटला. लहानसा मनोरा करून बालश्रीकृष्णाने दहीहंडी फोडली. तर दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला सचिन आरडे यांनी रोख 5001 रुपयाचे बक्षिस दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)