काटी परिसरात पाण्याअभावी पिके जळाली

रेडा- काटी (ता. इंदापूर) परिसरातील शेतीला निरा डावा कालव्याच्या पाण्याचे आवर्तन वेळेत मिळाले नाही. तसेच विहिरी आणि बोअर (कुपनलिका) कोरडे पडल्यामुळे पाण्याअभावी शेतात उभी असलेली पिके जळून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या जळालेल्या पिकांचे पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचा आधार द्यावा अशी मागणी इंदापूर तालुका युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील लवटे यांनी केली आहे.
या संदर्भात माहिती देताना युवक कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुनील लवटे म्हणाले की, मागील वीस वर्षात शेतीच्या आवर्तनाची कधीच शेतकऱ्यांना अडचणी आल्या नव्हत्या. माञ, उपेक्षित शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत, पाण्यांवर सायपनने अनाधिकृतपणे डल्ला या दोन वर्षांत सरार्सपणे चालू असताना देखील तालुक्‍यांचे आमदार योग्य सूचना करीत नाहीत. अधिकारी वर्गाला धारेवर धरत नाहीत. हे न समजणारे कोडे निर्माण झालेले आहे. माजी सहकारमंञी हर्षवर्धन पाटील यांनी 22 गावातील शेतकऱ्यांना कधीच पाणी आवर्तनापासून दूर ठेवले नाही. परंतु आता पिके गेली, पाणी नाही. शेती कसण्यासाठी शासकीय मदत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पाण्याअभावी 22 गावात असणाऱ्या काटी, रेडा, निरवांगी, सराफवाडी आणि निमसाखर तसेच लाखेवाडी या भागातील सध्या ऊस, मका, फळबागा पाण्यामुळे पिके जळू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जळून चाललेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी काटी परिसरातील शेतकरी यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)