काटी गावात कृषीदुतांकडून अनोखे प्रात्यक्षिक

रेडा- शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालय येथील कृषीदूत यांकडुन ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत काटी ता इंदापूर या गावात शुन्य उर्जा शीतकपाटाचे अनोखे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी सादर करण्यात आले.
सदर प्रात्यक्षिकाबाबतीत कृषीदुत हेमंत भांड यांनी माहिती देताना सांगितले की, सध्याच्या काळात लुप्त होत चाललेल्या पारंपरिक साठवणुक पद्धतीचा म्हणजेच शुन्य ऊर्जा शीतकपाटाचा वापर हा पुराणकाळापासुन भाजीपाला आणि फळे ताजेतवाने ठेवण्यासाठी, तसेच जास्त दिवस टिकवण्यासाठी केला जातो आणि ही साठवणूक पद्धत अत्यंत साधी आणि सोपी आहे. या साठवणूक पद्धतीने भाजीपाला व फळे इतर पद्धतीपेक्षा 10 ते 12 दिवस जास्त टिकतात. तसेच ही पद्धत अत्यंत कमी खर्चात शेतकरी तयार करू शकतात. या साठवणुक पद्धतीसाठी कोणत्याही प्रकारची विद्युत ऊर्जा लागत नाही. शुन्य उर्जा शीतकपाट हे सहजपणे कुठेही बांधता येते. शेतीच्या बांधावर झाडाखाली अथवा सावली उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी हे सहज बांधता येते.
याबाबतची कृषीदूत सूरज जाधव यांनी अधिकची माहिती देताना सांगितले की, हे शीतकपाट बांधताना वाळू, विटा आ-ण पाणी यांचा वापर करावा लागतो.
साधारण उंची 65 सेमी लांबी 167 सेमी व रुंदी 115 सेमी ठेवण्यात यावी. तसेच विटांच्या आत आणि बाहेरील बाजूस विटांचे दोन थर रचून त्यामध्ये वाळु भरण्यात यावी. नंतर त्यामध्ये भाजीपाला अथवा फळे ठेवुन त्यावरती योग्य पद्धतीने झाकण्यात यावे. व वाळुचा थर दररोज पाण्याने भिजत ठेवावा जेणेकरुन आतील तापमान बाहेरील तापमानापेक्षा कमी राहुन फळे व भाजीपाला जास्त दिवस टिकुन राहतो. अशा पद्धतीने आपण 10ते 12दिवस जास्त फळे व भाजीपाला ताजी राहतात.
याप्रसंगी कृषीदुत अभिषेक चव्हाण व मुरगेश काळगी यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. शेतकऱ्यांनीसुद्धा या अनोख्या व सध्या लुप्त होत चाललेल्या प्रात्यक्षिकाबाबतीत कुतुहलाने जाणुन घेतले.
प्रात्यक्षिकाचा उद्देश व फायदे कृषीदुत श्रेयश यादव यांनी प्रास्ताविकात सांगितले.
सदर प्रात्यक्षिकाचे आभार प्रदर्शन कृषीदुत विनायक मोरे यांनी केले.
या प्रात्यक्षिकासाठी कृषीदुतांना डॉ. एस. आर. माने. व प्रा. एस. एस. भोसले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे व प्रा. एस. आर. आडत यांचेही सहकार्य लाभले.
प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी कृषीदुत श्रेयश यादव, मन्मथ घोंगडे, अभिषेक चव्हाण, गणेशकुमार मुळे, विनायक मोरे, सुरज गाढवे, सुरज जाधव, मुरगेश काळगी, हेमंत भांड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)