काटवलीतील ‘फौजीं’चा ‘लागिर’च्या टीमकडून सत्कार

पंचगणी : काटवली या गावाचं आणि माझं नातं बालपणापासूनच घनिष्ठ असं आहे, येथील माणसं, जांभा दगड, कुडाळी नदी, शेती परिसर हा माझ्या “लगिर’ मालिकेचा उर्जास्तोत्र असल्याचे प्रतिपादन “लागिर झालं जी’चे लेखक तेजपाल वाघ यांनी केले.

काटवली (ता. जावळी) येथे जननी माता नेहरू युवा मंडळाच्यावतीने “लागिर झालं जी’ च्या कलावंतांच्या हस्ते गावातील भारतीय सैन्यातील जवान आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळे तेजपाल वाघ बोलत होते. यावेळी लागिरचे कलाकार राहुल्या – राहुल मगदूम, टॅलेंट – महेश जाधव, धोंडिबा कारंडे, प्रसिद्ध लेखक जगन्नाथ शिंदे, सरपंच हणमंत बेलोशे, मंडळाचे अध्यक्ष विजय कदम, विलास पाटील, योगेश बेलोशे आदी मान्यवर उपस्थित होते.

तेजपाल वाघ पुढे म्हणाले, मालिकेतील जीजी ही काटवलीच्या मातीतील जिवंत व्यक्तिरेखा आहे. काटवली आणि दापवडीत मी बालपणी रमलो, शिकलो त्याचच प्रतिबिंब लागिरमध्ये मी मांडलं असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी भारतीय सैन्यातील जवान भरत बेलोशे, नीलेश बेलोशे तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उपव्यवस्थापकपदी पदोन्नती झालेबद्दल संजय बेलोशे, रेशीम उद्योगातून सेवानिवृत्त झालेल्या जगन्नाथ बेलोशे, महादेव शिंदे, शंकर राजपूरे, इंदूबाई गोळे यांचा लागिर मालिकेतील कलाकारांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व सत्कारमूर्ती आणि जगन्नाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले, धनराज वट्टे व शैलेश महामुनी यांनी सूत्रसंचालन केले. योगेश बेलोशे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)