काझीरंगा नॅशनल पार्कमधील प्राण्यांच्या मदतीला धावला अक्षयकुमार

मुंबई : आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत आता अक्षयने आसामच्या मुख्यमंत्री रिलीफ फंड आणि काझीरंगा नॅशनल पार्कसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत केली आहे. स्वतः अक्षयने ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली.

अक्षयने लिहिले की, आसाममध्ये पुरात अडकलेल्या लोकांची अवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे. माणसं असो किंवा प्राणी संकाटाच्या या काळात सगळ्यांना मदतीची गरज आहे. मी मुख्यमंत्री रिलीफ फंड आणि काझीरंगा पार्क रेस्क्‍यूसाठी 1-1 कोटी रुपये मदत म्हणून देत आहे. तसेच लोकांनीही पुरपरिस्थितीत अडकलेल्या लोकांची आणि प्राण्यांची मदत करावी अशी मी विनंती करतो. याआधीही मे महिन्यात आलेल्या फेनी वादाळाचा फटका ओडिसाला बसला होता. यावेळीही अक्षयने पीडितांची 1 कोटी रुपये देऊन मदत केली होती. अक्षयशिवाय प्रियांका चोप्रानेही या आपत्तीतून पीडितांना बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)