काजू खरेदी पडली महागात

पिंपरी – तमिळनाडूच्या काजू विक्रेत्याने पिंपळे सौदागर येथील नागरिकाला काजू खरेदीमध्ये चक्क दोन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 14 जून ते 6 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत घडला.

याप्रकरणी अरविंद देवरावजी देवगडे (वय-43, रा. पिंपळे सौदागर) यांनी एस. के. आर. कॅश्‍यूस कंपनीचे मालक रामकृष्णन सुरेशकृष्णा (रा. कडलोर, तमिळनाडू) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगडे यांना काजूचा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी त्यांनी रामकृष्णनशी संपर्क साधला. त्यांच्यात व्यवहार ठरला, देवगडे तमिळनाडूला जाऊन तेथील रामकृष्णन यांची फॅक्‍ट्री बघून आले. देवगडे यांचा संपूर्ण विश्‍वास संपादन केल्यानंतर त्यांनी पहिली ऑर्डर म्हणून 2 लाख 15 हजार 500 रुपयांचे काजू मागवले. ती रक्कम संबंधीत कंपनीच्या बॅंक खात्यातही टाकले. मात्र या घटनेला तीन महिने उलटून गेले तरी काजू काही देवगडेंना मिळाले नाहीत व रक्कम देखील परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच देवगडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)