काजू क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी केंद्र, राज्य पातळीवर पॅकेजचा प्रस्ताव

तिरुअनंतपुरम : आजारी असलेल्या काजू क्षेत्राला पुनर्जीवित करण्यासाठी भारतीय काजू निर्यात प्रोत्साहन मंडळाने (CEPCI) या क्षेत्राला विशेष पॅकेज देण्याचे ठरवले आहे.

उत्पादनासाठी लागणारा खर्च कमी करणे, स्थानिक पातळीवर कच्च्या काजू फळांचे उत्पादन वाढवणे यासाठी हे पुनर्जीवित पॅकेज दिले जाणार आहे. याशिवाय या पॅकेजची अंमलबजावणी राज्य आणि केंद्र सरकार या दोन्हींच्या मदतीने केली जाणार आहे.

CEPCI ने केलेल्या दाव्यानुसार, काजू प्रक्रियेच्या नोंदणीकृत ८२४ पैकी तब्बल ७०० कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे सुमारे २.५ लाख कामगार बेरोजगार झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)