कागदी पिशव्या सांभाळतायेत “भार’

पिशव्यांचे वापरक्षेत्र वाढले
प्लॅस्टिक बंदीपूर्वी ठराविक काही व्यवसायांकडूनच कागदी पिशव्यांची मागणी होती. यामध्ये स्वीट होम, हर्बल प्रोडक्‍टस्‌, आइसक्रीम विक्रेते यांच्याकडूनच मागणी होती. मात्र, आता वाईनशॉप,कापडविक्रेते, शूज विक्रेते, किरणा व्यापारी, घरगुती उद्योजकांकडून कागदी पिशव्यांची मागणी वाढली आहे.

कल्याणी वाघमारे

निर्मिती करणाऱ्यांना “अच्छे दिन’ : प्लॅस्टिक बंदी ठरली काडीचा आधार

-Ads-

पुणे- प्लॅस्टिक बंदीनंतरपर्याय म्हणून कागदी पिशव्यांचा वापर आता वाढत आहे. साहजिकच मागणी वाढल्याने अशा पिशव्या तयार करणाऱ्या कामगारांच्या हातात आणखी बळ चढले आहे. त्यामुळे या व्यवसायातील सर्वांनाच “अच्छे दिन’ आल्याचा दावा कागदी पिशव्या बनविणाऱ्या वैष्णवी झुंजारराव यांनी केला.

प्लॅस्टिक बंदीपूर्वी दर महिन्याला 40 ते 50 किलो पेपर लागत होता. मात्र, आता मागणी वाढल्याने दरमहा 100 ते 150 किलो पेपरचा वापर होत आहे. त्यानुसार उत्पन्नही वाढले आहे. पूर्वी उत्पन्न प्रतिमहिना 30 ते 40 हजार इतके होते. पण, आता बंदीनंतर ते 70 ते 80 हजार रुपये प्रतिमाहिना मिळत आहेत. पिशव्यांची मागणी वाढली असली, तरी कागदाचा तुटवडा आहे.- वैष्णवी झुंजारराव, कागदी पिशव्यांच्या व्यावसायिक.

पूर्वी कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदारांकडून सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जात होत्या. मात्र बंदीनंतर दुकानदार आणि व्यापारी यांच्याकडून कागदी किंवा कापडी पिशव्या वापरण्यावर प्राधान्य दिले जात आहे. बाजारात या पिशव्यांची मागणी वाढल्यामुळे रद्दी विक्रेते, पिशव्या बनविणारे लघु उद्योजक यांच्याकडील उत्पादनांना मागणी वाढली आहे.

याबाबत झुंजारराव म्हणाल्या, 2014 मध्ये घरगुती स्तरावर आम्ही कागदी पिशव्यांचा व्यवसाय सुरू केला होता. सुरूवातीला स्वतः दुकान, कंपन्यांमध्ये जाऊन विचारावे लागत होते. मात्र, आता स्वत: दुकानदार, व्यावसायिक फोन करून आम्हाला पिशव्यांची ऑर्डर देतात. या पिशव्या पूर्णपणे हाताने तयार केल्या जातात. यामध्ये साधा पेपर, लोहकर, लेसचा वापर केला जातो. पिशवीची किंमत 1 ते 4 रुपयांपर्यंत आहे. मोठ्या पिशवीत 5 किलो वजन पेलले जाते. बॉक्‍स, प्लेन अशा वेगवेगळ्या पिशव्या तयार केल्या जातात.
यासाठी लागणारा पेपर थेट नागरिकांकडून रद्दी म्हणून घेतला जातो. कारण, तो जर दुकानातून घेतला, तर तो 15 ते 16 रु. किलोने दिला जातो. यामुळे पर्यावरणाला पूरक अशा या पिशव्या असल्याचे वैष्णवी झुंजारराव म्हणाल्या.

 

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)