कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

पिंपरी – आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रातर्फे कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण संत तुकारामनगर येथे देण्यात आले. सचिन नाईक आणि सौंदर्या मुलगे यांनी प्रशिक्षण दिले.

या शिबिराचा लाभ 100 प्रशिक्षणार्थींनी घेतला. या कार्यक्रमाची सुरुवात संकल्प सिध्दी व्याहुती होम आणि वातावरण शुध्दी, नकारात्मकता, नैराश्‍य, रोगराई निघून जाण्यासाठी त्र्यंबक होम सचिन नाईक आणि गुरुपुजा पुजा सिंघवी यांच्याकडून करण्यात आली.

या वेळी प्रशिक्षणार्थींनी प्लॅस्टीक मुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. सौंदर्या मुलगे, मेधा पाटील, प्रशांत महाजन, संगमेश मनट्टी, डॉ. शुभम लडकत, आशिष महाजन, अपुर्वा मुलगे यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)