ओतूर- संभाजी तांबे प्रतिष्ठान संचलित आस्था महिला महिला मंच यांच्या सहकार्याने स्वयं रोजगार आणि स्वावलंबनासाठी कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दि. 24 ते 28 मे या कायावधीत ओतूर (ता. जुन्नर) येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणाचे उद्‌घाटन जुन्नर पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मांडवी किनारा नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष संभाजी तांबे म्हणाले की, आस्था महिला मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर म्हणजे प्लॅस्टिकमुक्त ओतूर अभिनयाची सुरुवात आहे. सध्या प्लॅस्टिक बंदीमुळे कागदी पिशव्यांची मागणी वाढत आहे. पर्यावरण संतुलनासाठी याचा उपयोग होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य प्रशिक्षक सुनिल मोरे, ढोरे, आस्था महिला मंच ओतूर, मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था ओतूर यांचे लाभले.
यावेळी पुणे जिल्हा शिवसेना समन्वयक संभाजी तांबे, ग्रामपंचायत सदस्य आशिष शहा, आस्था महिला मंचाच्या अध्यक्षा नीलिमा तांबे, मालती डुंबरे, ऍड. रोहिणी गाडेकर, रसवंती पानसरे, मोनिका शहा, सुकन्या शहा, डॉ. पुष्पलता शिंदे, ऍड. वृषाली मोरे, शबाना मोमीन, मंजूषा डुंबरे, डॉ. सुनीता वेताळ, प्रतिभा तांबे, वर्षा वल्हवणकर, कविता भोर, डॉ. रश्‍मी घोलप, संदीप बोचरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)