कागदपत्रे तपासूण अचूक नोंदी करा अन्यथा आंदोलन करू

ऑल बॅकवर्ड क्‍लासेस ऑर्गनायझेशनचा इशारा
मंचर  -वक्‍फ मालमत्तांच्या बाबतीत अधिकार अभिलेखात म्हणजेच गाव नमुना नंबर 7/12 आणि सिटी सर्व्है उताऱ्यामध्ये मुतवल्ली किंवा इतर व्यक्‍तींच्या नावाऐवजी संबंधित वक्‍फ संस्थेची नावे येणे अनिवार्य आहे. या नोंदी करताना संबंधित अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डकडे नोंदणी हित संस्थांची कागदपत्रे तपासूण अचूक नोंदी करण्यात किंवा संबंधित दर्गाह मशिदीची अचूक नोंदी कराव्यात. अन्यथा पुढील भविष्यकाळात संबंधित वक्‍फ मिळकतीबद्दल संभ्रम निर्माण होण्याच्या शक्‍यता आहेत. या मिळकतीवर वक्‍फ संस्थांची न्याय हक्कानुसार अचूक नोंद न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ऑल बॅकवर्ड क्‍लासेस ऑर्गनायझेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष बादशहा इनामदार यांनी दिला.
महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभाग आणि महसूल विभागाकडून शासन आदेशानुसार राज्यातील वक्‍फ मालमत्ता यामध्ये मशिदी, दर्गाह, कब्रस्तान, अनाथालय, ईदगाह आदी संस्थांशी संलग्न वक्‍फ अधिनियम 1995 च्या कक्षेमध्ये येणाऱ्या स्थावर मालमत्ता यामध्ये गाव नमुना नंबर 7/12 च्या उताऱ्यावर तसेच नागरी भागातील वक्‍फ संस्थेचे नाव व इतर हक्‍त सदरील वक्‍फ प्रतिबंधीत सत्ता प्रकार अशी नोंद घेणे कायदेशीर बंधनकारक आहे. त्याकरीता संबंधित उपअधीक्षक भूमीअभिलेख आंबेगाव व तहसीलदार आंबेगाव यांनी बिनचुक कार्यवाही करण्याची मागणी मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्‍लासेस ऑर्गनायझेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष बादशहा इनामदार यांनी केली आहे.
यावेळी संघटनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन आणि शासन निर्णयाच्या प्रती देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील वक्‍फ मिळकतीचे सर्व्हेक्षण शासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. हे सर्व्हेक्षण करण्यासाठी तालुक्‍यातील तहसीलदारांची सहायक सर्व्हेक्षण आयुक्‍त म्हणुन नियुक्‍ती करण्यात आली आहे. तसेच नगर भूमापन अधिकारी व उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या अंतर्गत सर्व्हेक्षणाची कार्यवाही करण्याचे शासनाने ठरविले आहे. गाव नमुना 7/12 वर तसेच नागरी भागातील अभिलेखांमध्ये वक्‍फ मिळकतीवर वक्‍फ संस्थांची बिनचुक नावे नोदवावीत. या मिळकतीवर वक्‍फ संस्थांची न्याय हक्कानुसार अचूक नोंद न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंबेगाव तालुक्‍याचे तहसीलदार आणि भूमिअभिलेख यांना एका निवेदनाद्वारे दिल्याची माहिती मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्‍लासेस ऑर्गनायझेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष बादशहा इनामदार यांनी दिली.
यावेळी नुरे -ए-मुस्तफा यंग सर्कल घोडेगाव, एमवायसी ग्रुप मंचर, हाजी नजीर चॅरीटेबल ट्रस्ट शिनोली, मुस्लिम जमात पेठ, फकीरवाडी, ख्वाजा गरीब नवाज हेल्थ केअर सोसायटी आंबेगाव तालुका, दस्तगीर मुजावर मित्र मंडळ लाखणगाव, अवसरी सुन्नी मुस्लिम जमात, सुन्नी मुस्लिम जमात निरगुडसर, सेव फाउंडेशन मंचर आदी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)