काकाने कर्जाचे पैसे न दिल्याने पुतण्याचे अपहरण : येरवडा पोलिसांनी तिघांना केले जेरबंद

न्यायालयाने तिघांना सुनावली पोलीस कोठडी

पुणे – काकाने कर्जापोटी घेतलेले दोन लाख रुपये परत न दिल्याने 17 वर्षीय पुतण्याचे अपहरण करणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांनी 9 तासाच्या आत जेरबंद केले. त्या तिघांना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी दिला आहे.
विशाल दत्तात्रय ढोले (वय 28 रा. सणसवाडी, मु.पो. येणेरे, ता. जुन्नर), स्वप्नील शांताराम तांबे (वय 25, रा. सणसवाडी, मूळ. गणेगाव वरूडे, ता. जुन्नर) आणि सचिन बंडू थिटे (वय 25 रा. सणसवाडी) अशी पोलीस कोठडी झालेल्या तिघांची नावे आहेत. तिघांकडून पोलिसांनी एक झेन आणि एक इनोव्हा कार जप्त केली आहे. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन जाधव यांनी विशाल ढोले याचा भाऊ निखिल ढोले याच्याकडून व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेतले होते. मात्र, ते वेळेत परतफेड करू शकले नाहीत. त्यामुळे ढोले याच्याकडून या रकमेसाठी तगादा लावण्यात येत होता.
मंगळावारी (दि.10) किसन यांचा सतरा वर्षांचा पुतण्या रोहित ऊर्फ सोनू मच्छिंद्र जाधव घराबाहेर फिरत असताना तिघांना दिसला. त्यांनी त्याला बोलावून घेतले. एका चारचाकी गाडीत बसवून त्याला नेले. रात्री उशिरापर्यंत पुतण्या घरी न आल्यामुळे किसन यांनी याची माहिती येरवडा पोलिसांना दिली. येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट, पोलीस हवालदार हरिश्‍चंद्र मोरे, हनुमंत जाधव, अजीज बेग, प्रवीण जगताप, पोलीस नाईक नागेश कुंवर, मनोज कुदळे, अशोक गवळी, समीर भोरडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान त्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तिघांनी सोनू याला मारहाण केली आहे. याबाबत आणि इतर तपास करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)