काकड आरतीमुळे उरूळी कांचन भक्‍तीरसात चिंब

उरुळी कांचन- उरुळी कांचन परिसरात दररोज होणाऱ्या काकड आरतीमुळे परिसरात भक्‍तीमय वातावरण निर्माण आहे. उरुळी कांचन येथील श्रीराम मंदिरात तर सोरतापवाडी येथील हनुमान मंदिरात दररोज पहाटे काकड आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी भूपाळी अंधाळेनंतर गवळणसह विविध अंभगाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महादेव कांचन यांनी दिली. गणपतीची आरतीनंतर शंकर, दत्तगुरू यांच्यासह सर्व देवीच्या आरती घेऊन शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता होती, अशी माहिती मनीषा तुपे व अजिंक्‍य कांचन यांनी दिली. यावेळी गावातील मान्यवरांच्या हस्ते नाष्ट्याचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मिलिंद कांचन व अविनाश तुपे यांनी दिली. उरुळी कांचन येथील उरुळी कांचनमध्ये स्वच्छता अभियानाच्या वतीने सलग तीन वर्ष दिवाळीनिमित्त “दिवाळी पहाट’ हनुमान मंदिर, काळभैरवनाथ मंदिर, श्रीकृष्ण मंदिरात दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती संतोष चौधरी व किरण वांझे यांनी दिली. सामाजिक उपक्रमाचा आदर्श स्वयंसेवी संस्थांनी घ्यावा, असे मत अस्मिता पतसंस्थेच्या चेअरमन प्रतिभा कांचन यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)