काकडे सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला

करंजे – गडदरवाडी (ता. बारामती) येथील बाबालाल काकडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कमल गुलाब लकडे, तर उपाध्यक्षपदी सोमनाथ शिवराम गडदरे यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या 73 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रथमच एका महिला सदस्याला अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. सोसायटीच्या सभागृहात झालेल्या संचालकमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ई. टी. महार्नवर यांनी काम पाहिले. संस्थेचे सचिव शिवाजी लडकत यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी शिवाजी गडदरे, बाळू मदने, संतोष गडदरे, सागर गलांडे, बापू गडदरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)