काकडे महाविद्यालयात मतदार जनजागृती

सोमेश्वरनगर -येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. करंजेपूल येथील नागरीक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मतदार जनजागृती करत भारतीय राज्यघटनेमध्ये एक व्यक्ती एक मत हा क्रांतीकारक बदल असल्याचे सांगितले. त्याचं गोष्टीचा सकारात्मक विचार करून महाविद्यालयातर्फे हे अभियान राबवण्यात आले. समाजातील प्रत्येक नागरिकाने संविधानातून मिळालेला प्रौढ मताधिकार किती महत्वाचा आहे. या विषयावर आपली मते स्पष्ट व्यक्त केली. लोकशाहीचे संवर्धन आणि संरक्षण योग्य रीतीने करायचे असेल, तर समाजातील प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे असा संदेश या अभियानातून जाहीर देण्यात आला. करंजेपुलच्या नागरिकांना संविधानाच्या उद्देशिकांचे वाटप करण्यात आले. या अभियान कार्यक्रमासाठी मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी गणेश निकम, गणेश आटोळे, प्रियांका दळवी, योगेश ननवरे, शिवानी भागवत, मानसी शिंदे, विकास सावंत, महेश कर्चे, पूनम साळुंखे, अजय सूर्यवंशी, निलेश होळकर यांनी यामध्ये सहभाग घेतला. अभियानासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश आढाव. प्रा. डॉ. नारायण राजुरवार यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)