काकडे महाविद्यालयातील प्रा. वायदंडे विद्यापीठाच्या अधिसभेवर

सोमेश्‍वरनगर  – येथील मुगूटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. देविदास वायदंडे यांची सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर भरघोस मतांनी निवड झाली.
नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अध्यापक गटातून दहा सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्पुक्‍टो) व पुणे विद्यापीठ टीचर्स असोसिएशन (पुटा) यांच्या संयुक्‍त आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ या दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली. यात पुटा व स्पुक्‍टो यांच्या संयुक्‍त पॅनलने आठ जागा जिंकत आपले वर्चस्व राखले. प्रा. डॉ. देविदास वायदंडे हेही याच पॅनलकडून निवडणुकीस उभे होते. वायदंडे हे अनेक वर्षे शिक्षण व सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. त्यांनी स्पुुक्‍टो प्राध्यापक संघटनेचे काही काळ काम पाहिले आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथनिवड समितीचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या कामकाजात सामान्य विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयांसाठी जास्तीत जास्त काम करून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे प्रा. डॉ. देविदास वायदंडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)