काकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची “सुवर्ण’ कामगिरी

सोमेश्वरनगर – सोमेश्वरनगर येथील मुगटराव काकडे महाविद्यालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे शहर, जिल्हा, अहमदनगर आणि नाशिक या चार विभागातून 160 विद्यार्थी आणि 80 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
स्पर्धेत काकडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी उमा कर्चे हिने 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले, तसेच महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय खेळाडू अंकिता गुंड हिने 59 किलो वजनगटात सुवर्णपदक, 53 किलोमध्ये मोनाली गायकवाड हिने रौप्यपदक पटकावले. सोनाली तोडकर आणि मनीषा दिवेकर या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविले. विद्यार्थ्यांमध्ये चंदन मरगजे याने 60 किलो वजनी गटात ग्रीकोरोमन कुस्तीत रौप्यपदक मिळविले.
स्पर्धेमध्ये सागर मारकड, हर्षवर्धन सदगीर, तुकाराम शितोळे, आदर्श गुंड या खेळाडूंनी आपापल्या वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला. पुणे विभागाचे सहाय्यक क्रीडा संचालक डॉ. दत्ता महादम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सतीश सकुंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, तर विद्यार्थिनींच्या स्पर्धेचे उद्‌घाटन वाघळवाडीच्या सरपंच नंदा सकुंडे, डॉ. दत्ता महादम, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. उद्‌घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे सहसचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, शिवाजीराव शिंदे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)