काकडे पतसंस्थेकडून 15 टक्के लाभांश

आळेफाटा-पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे वसंतराव पाटील काकडे पतसंस्थेच्या वतीने सभासदांना 15 टक्के लाभांशासह दीपावली भेट वस्तू वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती व्यवस्थापिका प्रेरणा वामन यांनी दिली. येथील संस्थेच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रकांत येंधे, सचिव कल्पना काचळे, संचालक भालचंद्र करांडे, रमेश वाघुले, विजय भोर, योगेश वामन, अनिल शेटे, संजय खेडकर, मंगेश शिंदे, पिराजी टाकळकर, संतोष ठिकेकर, मंगल काकडे, योगेश थोरात, संतोष बोडके, विश्वास सोनवणे, व्यवस्थापक नीतिन औटी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब काकडे यांनी प्रास्तविकातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच संस्थेच्या आकर्षक योजनांची माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)