काकडा कीर्तन सप्ताह व गाथा भजन सोहळ्याची सांगता

पिंपळे-सौदागर – येथील विठ्ठल-रुक्‍मिणी वारकरी संस्थेतर्फे सुवर्ण महोत्सव काकड आरती कीर्तन सप्ताह व गाथा भजन सोहळ्याचे दि. 24 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर आयोजन करण्यात आले होते. सप्ताहामध्ये रोज पहाटे 4.30 ते 6.30 काकडा, सकाळी 9 ते 12 गाथा भजन, दुपारी 1 ते 5 महिला भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व सायंकाळी 7 ते 9 हरि कीर्तन आयोजित केले होते.
सप्ताहामध्ये विविध नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन झाले. शनिवार दि. 24 नोव्हेंबरला सायंकाळी ह.भ. प. जनक महाराज सोळंके, रविवारी ह. भ. प. महंत प्रमोद महाराज जगताप, सोमवारी ह. भ. प.संदीपान महाराज शिंदे, मंगळवारी ह. भ. प. भारत महाराज जोगी, बुधवार ह. भ. प. केशव महाराज उखळीकर, गुरुवारी ह. भ. प. उद्धव महाराज मंडलिक, शुक्रवारी ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी सामाजिक कार्यातील अग्रणी विद्यमान नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांचा यावेळी सन्मान केला. दि. 30 डिसेंबरला सायंकाळी 7 ते 9 मुंबईचे वाणी भूषण ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील यांनी नगरसेविका शितल काटे यांचा समाज कार्याबद्दल सन्मान केला. दि. 1 डिसेंबरला स. 10 ते 12 रामायणाचार्य ह. भ. प. रामरावजी महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन झाले. विठ्ठल-रुक्‍मिणी वारकरी संस्थेचे अध्यक्ष संदेश काटे पाटील यांच्या हस्ते महाराजांना यावेळी सन्मानीत करण्यात आले.
काल्याच्या कीर्तनास प्रामुख्याने ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील उपस्थित होते. त्यांचाही सन्मान संस्थेने केला. सांप्रदायिक क्षेत्रातील सेवेबद्दल ह. भ. प. खंडूजी झिंजुर्डे, ह. भ. प. रघुनाथ काटे, ह. भ. प. पंडित काटे, ह. भ. प. आनंदा काटे, ह. भ. प. शेखर सुखदेव काटे, ह. भ. प. विलास बाबुराव काटे, ह.भ. प. रामचंद्र महादू भिसे यांचा सत्कार केला. शेवटी भाविकांना महाप्रसाद वाटप केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)