कांद्याच्या भावात वाढ होण्यास सुरूवात

निर्यातदारांकडून वाढली मागणी


दोन दिवसात घाऊक बाजारात प्रती किलो दीड रुपया वाढ

पुणे – गेल्या काही दिवसांमधील घसरणीनंतर आता पुन्हा कांद्याचे भाव वाढण्यास सुरूवात झाली आहे. निर्यातदारांकडून कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आवक वाढूनही मागील दोन दिवसात कांद्याच्या भावात घाऊक बाजारात प्रती किलो दीड रुपयांनी वाढ झाली आहे. रविवारी बाजारात तब्बल 200 ट्रक कांद्याची आवक झाली होती. घाऊक बाजारात प्रती दहा किलोस 80 ते 100 रुपये भाव मिळाल्याची माहिती व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. कांद्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्‍यताही आता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
पोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याचे भाव काही दिवस वाढले होते. मात्र, त्यानंतर उत्पादनात झालेली वाढ तसेच निर्यातदारांकडून घटलेल्या मागणीमुळे पुन्हा भावात घट झाली होती. तेव्हापासून भाव पडलेलेच होते. त्यानंतर शुक्रवारपासून कांद्याला निर्यातदारांकडून मागणी वाढली असल्याने भावात अल्पशी वाढ झाली आहे. मात्र, दक्षिणेकडील राज्यांमधून कांद्यास विशेष मागणी नाही. सध्या पुणे जिल्ह्यातील गरवी कांद्याचा हंगाम जवळपास 70 टक्के संपला आहे. अजून 30 टक्के कांदा शिल्लक आहे. गरवी कांद्याचा हंगाम आणखी महिनाभर चालेल, असा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. दरम्यान कांदा उत्पादकांनी भाव वाढू लागल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. कांद्याच्या भावात आणखी वाढ व्हावी, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)