कांद्याच्या भावात घसरण सुरुच

चाकण बाजारभाव : एकूण उलाढाल 2 कोटी 90 लाख

चाकण- चाकण बाजारात कांद्याची आवक वाढून भाव 200 रुपयांनी कमी झाले. या आठवड्यात बटाटा आवक वाढून भाव मात्र उतरले. हिरवी मिरची आवक कमी झाली. तर कोबी, फ्लॉवर, वांगी, दोडका, कारली, दुधी भोपळा या फळभाज्यांची आवक वाढली, तर भाव घसरले. भूईमुग शेंग आवक कमी झाली भाव 5500 रुपयांवर स्थिर झाले, लसूण आवकमध्ये किरकोळ वाढ झाली, तर भाव स्थिरावले. या आठवड्यात भाज्यांची आवक वाढली व भाव घसरले. जनावरांच्या बाजारात उलाढाल वाढली. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 90 लाख रुपये झाली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक 150 क्विंटलने वाढली, तर भाव मात्र 200 रुपयाने घसरून 1100 रुपये झाले. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 1250 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1100 रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1464 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 199 क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव 200 रुपयाने घटून 1800 रुपये झाला. भूईमुग शेंगाची आवक 05 क्विंटल झाली भाव 5500 स्थिर झाले. लसणाची एकूण आवक 05 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 1 हजार 800 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 438 पोती झाली.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 80 हजार जुड्यांची आवक होऊन 201 ते 1000 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 55 हजार जुड्यांची आवक होऊन 101 ते 750 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक 1500 जुड्या झाली. 501 ते 765 असा जुड्यांना भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :-
कांदा
क्रमांक एक : 1100
क्रमांक एक : 800
क्रमांक एक : 400
एकूण आवक : 1250 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1800
क्रमांक एक : 1400
क्रमांक एक : 1000
एकूण आवक : 1464 क्विंटल
भूईमुग शेंग
क्रमांक एक : 5500
क्रमांक एक : 5000
क्रमांक एक : 4500
एकूण आवक : 05 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 1800
क्रमांक एक : 1500
क्रमांक एक : 1000
एकूण आवक : 05 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 872 पेट्या (400 ते 800), कोबी : 396 पोती (300 ते 600), फ्लॉवर : 408 पोती (500 ते 1000), वांगी : 524 पोती (1000 ते 2000), भेंडी : 327 पोती (1500 ते 2500), दोडका : 361 पोती (1500 ते 2000), कारली : 418 डाग (1000 ते 2000), दुधीभोपळा : 294 पोती (5000 ते 1000), काकडी : 398 पोती (1000 ते 2000), फरशी : 318 पोती (2000 ते 3000), वालवड : 272 पोती (2000 ते 4000), गवार : 215 पोती (2000 ते 3000 ), ढोबळी मिरची : 623 डाग (1000 ते 1400), चवळी : 218 पोती (1000 ते 2000), शेवगा :192 डाग (2000 ते 3000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 27872 जुड्या (400 ते 800), कोथिंबीर : एकूण आवक : 31316 जुड्या (300 ते 800), शेपू : एकूण आवक : 4525 जुड्या (500 ते 800), पालक : एकूण आवक : 3980 जुड्या (300 ते 500).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 125 जर्शी गायींपैकी 80 गायींची विक्री झाली त्यांना 10 ते 40 हजार, 350 बैलांपैकी 250 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 25 हजार, 75 म्हशींपैकी 45 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 70 हजार, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 8750 शेळ्या-मेंढ्यापैकी 7100 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)