कांद्याच्या भावात घसरण सुरूच

चाकण- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्डवर कांद्याची आवक या आठवड्यात 85 क्विंटल ने वाढली ते भाव 50 रुपयाने घसरले. तर नवीन बटाटा आवक सुरू झाली ती 2470 क्विंटल होऊन भाव 1700 रुपये झाले. हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, काकडी, फरस बी, वालवर, वाटाणा, शेवगा या फळभाज्यांची आवक या आठवड्यात कमी झाली तर भाव कमी जास्त प्रमाणत उतरले. लसूण आवक 5 क्विंटलवर स्थिर झाली तर भावही 2500 रुपयांवर स्थिर झाले. भूईमुग शेंग आवक या आठवड्यात 20 पोती झाली व भाव वधारले. फळभाज्या आवक किरकोळ प्रमाणत घटली व भाव उतारले. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 20 लाख रुपये झाली.
येथील महात्मा फुले मार्केट यार्डवर चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 775 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1000 रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 2470 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 672 क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव 1700 रुपये स्थिर झाला . या सप्तहात भूईमुग शेंगाची आवक 20 पोती झाली .लसणाची एकूण आवक 05 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 350 पोती झाली.भाव 2500 रुपये स्थिर झाला.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 1 लाख 80 हजार जुड्यांची आवक होऊन 200 ते 1401 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 60 हजार जुड्यांची आवक होऊन 151 ते 2205 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक 40000 हजार जुड्या झाली. 201 ते 581 असा जुड्यांना भाव मिळाला .
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 1000
क्रमांक दोन : 900
क्रमांक तीन : 700
एकूण आवक : 775 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1700
क्रमांक दोन : 1500
क्रमांक तीन : 1200
एकूण आवक : 2470 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 2500
क्रमांक दोन : 2000
क्रमांक तीन : 1800
एकूण आवक : 05 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागाना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 1115 पेट्या (400 ते 800), कोबी : 315 पोती (400 ते 600), फ्लॉवर : 260 पोती (1000 ते 1500), वांगी : 495 : पोती (2000 ते 3000), भेंडी : 445 पोती (2000 ते 3000), दोडका : 240 पोती (2000 ते 3000), कारली : 370 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा : 192 पोती (1000 ते 1500), काकडी : 205 पोती (1000 ते 2000), फरशी : 150 पोती (1500 ते 2500), वालवड : 295 पोती (2000 ते 3000), गवार : 230 पोती (2500 ते 4000),ढोबळी मिरची : 612 डाग (1000 ते 2000), चवळी : 92 पोती
(1000 ते 2000), शेवगा : 40 डाग (3000 ते 5000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 12540 जुड्या (400 ते 800), कोथिंबीर : एकूण आवक : 17652 जुड्या (200 ते 400), शेपू : एकूण आवक : 4969 जुड्या
(400 ते 600), पालक : एकूण आवक : 4280 जुड्या (400 ते 600).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 150 जर्शी गायींपैकी 100 गाईची विक्री झाली त्यास 10 ते 40 हजार, 230 बैलांपैकी 150 बैलांची विक्री झाली त्यास 10 ते 30 हजार, 125 म्हशींपैकी 102 म्हशींची विक्री झाली त्यात 20 ते 80 हजार, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 6480 शेळ्या-मेंढ्यापैकी 2570 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 9 हजार इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 45 लाख उलाढाल झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)