कांद्याच्या भावात किरकोळ वाढ

चाकण बाजारभाव : भाज्यांची आवक, भाव वाढले

चाकण- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये बाजारात कांद्याची आवक या आठवड्यातही सुमारे 4960 क्विंटलने वाढली, तर भावातही 50 रुपय वाढ झाली. बटाटा आवक 17 क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. शेवगा, चवळी,वालवर, हिरवी मिरची, टोमाटो, दुधी भोपळा, फ्लॉवर, वांगी, भेंडी, वाटाणा, गाजर, ढोबळी मिरची यासह भाज्यांची आवक वाढली व भाव वाढले. भूईमुग शेंग आवक वाढली व भाव कमी झाले. तर गेल्या शनिवारच्या तुलनेत लसूण आवक वाढून होऊन भावही वाढले. पालेभाज्यांची आवक वाढली. तर जनावरांच्या बाजारात उलाढाल कमी झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 34050 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 800 रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1032 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 17 क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव 1200 रुपयावर स्थिर झाला. या आठवड्यात भूईमुग शेंगाची आवक 05 क्विंटल झाली, भाव 5 हजार 300 रुपये झाले. लसणाची एकूण आवक 3 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार 600 रुपये झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 432 पोती झाली. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 1 लख 40 हजार जुड्यांची आवक होऊन 51 ते 430 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 70 हजार जुड्यांची आवक होऊन 51 ते 451 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.

  • जनावरांच्या बाराजार दोन कोटींची उलाढाल
    चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 65 जर्शी गायींपैकी 35 गाईची विक्री झाली त्यांना 10 ते 60 हजार, 80 बैलांपैकी 45 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 35 हजार, 155 म्हशींपैकी 120 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 70 हजार, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 9530 शेळ्या-मेंढ्यापैकी 7400 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना त्यांना 1500 ते 13 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 2 कोटी 5 लाख रुपये उलाढाल झाली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)