कांद्याच्या भावात किंचीत वाढ

चाकण- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक 3 हजार क्विंटलने वाढून भावात ही वाढ झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या भावात 299 रुपयांनी वाढ झाली. बटाटा आवक 260 क्विंटल ने घटून 650 क्विंटल झाली भाव मात्र 300 रुपयाने वधारले. हिरवी मिरची आवक घटली व भाव स्थिर झाले. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 70 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 7500 क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक 3 हजार क्विंटलने वाढली. कांद्याचा कमाल भाव 901 रूपयांवरून 1200 रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 650 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 260 क्विंटलने घटली. बटाट्याचा कमाल भाव 300 रुपयाने वाढून 1500 रुपये झाला. भुईमूग शेंगाची (जळगाव) एकूण आवक 10 क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव 5300 रुपयावरून घटून 5500 रुपये झाला. भुईमूग शेंग (बंदूक) आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 10 क्विंटल झाली असून लसणाचा कमाल भाव 3 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 140 पोती झाली. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 5 लाख 45 हजार 450 जुड्यांची आवक होऊन 500 ते 1800 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 6 लाख 13 हजार जुड्यांची आवक होऊन 500 ते 1790 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव
कांदा :
क्रमांक एक : 1200
क्रमांक दोन : 900
क्रमांक तीन : 700
एकूण आवक : 7500 क्विंटल
बटाटा :
क्रमांक एक : 1500
क्रमांक दोन : 1100
क्रमांक तीन : 800
एकूण आवक : 650 क्विंटल
भुईमूग शेंग (जळगाव):
क्रमांक एक : 5590
क्रमांक दोन : 5000
क्रमांक तीन : 4500
एकूण आवक : 10 क्विंटल
लसूण :
क्रमांक एक : 3500
क्रमांक दोन : 3000
क्रमांक तीन : 2500
एकूण आवक : 10 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 430 पेट्या (600 ते 1000), कोबी : 180 पोती (200 ते 400 ), फ्लॉवर : 200 पोती (300 ते 600), वांगी : 160 पोती (800 ते 1500), भेंडी : 200 पोती (1500 ते 2500), दोडका : 120 पोती (1500 ते 2500), कारली : 180 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा : 100 पोती (600 ते 1500), काकडी : 150 पोती (600 ते 1200), फरशी : 60 पोती (2000 ते 3000), वालवड : 160 पोती (1000 ते 3000), गवार : 80 पोती (4000 ते 6000), ढोबळी मिरची : 210 डाग (1500 ते 2500), चवळी : 30 पोती (3000 ते 5000), वाटाणा : 90 पोती (2000 ते 3000), शेवगा : 80 डाग (1500 ते 2500).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 4692 जुड्या (700 ते 1000), कोथिंबीर : एकूण आवक : 14594 जुड्या (500 ते 1000), शेपू : एकूण आवक : 4281 जुड्या (400 ते 600), पालक : एकूण आवक : 6248 जुड्या (200 ते 450).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 62 जर्शी गायींपैकी 37 गाईची विक्री झाली (15 ते 50 हजार रुपये), 192 बैलांपैकी 140 बैलांची विक्री झाली (10 ते 30 हजार रुपये), 110 म्हशींपैकी 87 म्हशींची विक्री झाली (20 हजार ते 70 हजार रुपये), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 9000 शेळ्या-मेंढ्यापैकी 8300 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1200 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 60 लाखांची उलाढाल झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)