कांद्याचे भाव स्थिर

चाकण बाजार भाव : एकूण उलाठाल 2 कोटी 80 लाख

चाकण- चाकण बाजारात कांद्याची आवक वाढून भाव स्थिर झाले. या आठवड्यात बटाटा आवक व भाव वाढले, हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर आवक व भाव वाढले. भूईमूग शेंग आवक स्थिर भाव वाढले. लसूण आवक मध्ये वाढ तर भाव स्थिरावले. या सप्ताहात भाज्यांची आवक आवक व भाव वधारले, जनावरांच्या बाजारात उलाढाल वाढली, बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 80 लाख रुपये झाली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक 700 क्विंटलने वाढली, भाव मात्र 1300 रुपयांवर स्थिर झाले. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 1100 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1300 रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1265 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 352 क्विंटलने वाढली बटाट्याचा कमाल भाव 200 रुपयाने वाढून 2000 रुपये झाला. या आठवड्यात भूईमुग शेंगाची आवक 7 क्विंटल झाली भाव गेल्या शनिवारच्या तुलनेत 1 हजार रुपयाने वाढून 5500 झाले. लसणाची एकूण आवक 04 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 1 हजार 800 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 518 पोती झाली.

-Ads-

राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 45 हजार जुड्यांची आवक होऊन 251 ते 1500 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 20 हजार जुड्यांची आवक होऊन 301 ते 1251 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक 5 हजार जुड्या झाली. 501 ते 1201 असा जुड्यांना भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 1300
क्रमांक एक : 1000
क्रमांक एक : 800
एकूण आवक 100 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 2000
क्रमांक एक : 1500
क्रमांक एक : 1000
एकूण आवक : 1265 क्विंटल
भुईमूग शेंग
क्रमांक एक : 5500
क्रमांक एक : 5225
क्रमांक एक : 5000
एकूण आवक : 7 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 1800
क्रमांक एक : 1500
क्रमांक एक : 1000
एकूण आवक : 4 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 858 पेट्या (800 ते 1200), कोबी : 391 पोती (400 ते 800), फ्लॉवर : 342 पोती (500 ते 1000), वांगी : 418: पोती (3000 ते 4000), भेंडी : 412 पोती (3000 ते 4500), दोडका : 216 पोती (2500 ते 3500), कारली : 351 डाग (3000 ते 3000), दुधीभोपळा : 204 पोती (1000 ते 2000), काकडी : 368 पोती (1000 ते 2000), फरशी : 132 पोती (3000 ते 5000), वालवड : 227 पोती (3000 ते 5000), गवार : 218 पोती (4000 ते 6000), ढोबळी मिरची : 481 डाग (1000 ते 2000), चवळी : 112 पोती (1000 ते 2000), शेवगा :90 डाग (1000 ते 2000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयात)
मेथी : एकूण आवक : 21294 जुड्या (500 ते 1000), कोथिंबीर : एकूण आवक : 27530 जुड्या (300 ते 900), शेपू : एकूण आवक : 2951 जुड्या (800 ते 1000), पालक : एकूण आवक : 4538 जुड्या (400 ते 600).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 120 जर्शी गायींपैकी 75 गाईची विक्री झाली त्यांना 10 ते 50 हजार, 120 बैलांपैकी 110 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 30 हजार, 150 म्हशींपैकी 130 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 95 हजार रुपये, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 9400 शेळ्या-मेंढ्यापैकी 8500 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)