कांद्याचे भाव वधारले

चाकण- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये चाकण मार्केट यार्डात कांद्याची आवक घटून भावात वाढ झाली, तर बटाट्याची आवक व भावात घट झाली. तरकारी बाजारात टोमॅटोची आवक आठ पटीने वाढली. पालेभाज्यांची आवक घटली, तर फळभाज्यांची आवक तीन ते पाच पटीने वाढली. तरकारी बाजारात हिरवी मिरची, वालवड, वाटाणा, शेवगा भाव तेजीत राहिले. जनावरांच्या बाजारात बोकड बोकड व शेळ्या-मेंढ्यांची विक्री वाढली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 650 क्विंटल झाली. कांद्याची आवक 50 क्विंटलने घटून भाव 50 रुपयांनी वाढले. कांद्याचा कमाल भाव 1350 रुपयांवर स्थिर राहिला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1680 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 320 क्विंटलने घटली. बटाट्याचा भाव 400 रुपयांनी घटून कमाल भाव 1600 रुपयांवर स्थिर राहिला. बाजारात भूईमुग शेंगाची आवक झाली नाही. तरकारी बाजारात हिरव्या मिरचीची एकूण 410 पोती आवक झाली. मिरचीला 2 हजार ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 1350
क्रमांक दोन : 1050
क्रमांक तीन : 650
एकूण आवक : 650 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1600
क्रमांक दोन : 1400
क्रमांक तीन : 1100
एकूण आवक : 1680 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 2500
क्रमांक दोन : 2300
क्रमांक तीन : 2000
एकूण आवक : 8 क्विंटल
फळभाज्या : प्रती 100 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
हिरवी मिरची : 410 पोती (2000 ते 4000), टोमॅटो : 1120 पेट्या
(800 ते 1600), कोबी : 272 पोती (800 ते 1200), फ्लॉवर : 222 पोती ( 900 ते 1500 ), वांगी : 690 : पोती ( 2000 ते 3000), भेंडी : 410 पोती (2000 ते 3000), दोडका : 295 पोती (2500 ते 3500), कारली : 425 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा : 270 पोती (600 ते 1200), काकडी : 240 पोती (700 ते 1200), फरशी : 77 पोती (2500 ते 3500), वालवड : 285 पोती (2000 ते 4000), गवार : 315 पोती (2500 ते 3500), ढोबळी मिरची : 350 डाग (2500 ते 3500), चवळी : 80 पोती (2000 ते 3000), वाटाणा : 125 पोती (3500 ते 5500), शेवगा : 75 डाग (4000 ते 6000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत) :
मेथी : एकूण आवक : 12340 जुड्या (400 ते 900), कोथिंबीर : एकूण आवक : 22440 जुड्या (300 ते 600), शेपू : एकूण आवक : 5890 जुड्या
(200 ते 600), पालक : एकूण आवक : 4265 जुड्या (300 ते 500).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या व भाव पुढीलप्रमाणे 90 जर्शी गायींपैकी 55 गाईची विक्री झाली भाव 15 ते 45 हजार रुपये, 125 बैलांपैकी 70 बैलांची विक्री झाली भाव 10 ते 30 हजार रुपये, 190 म्हशींपैकी 130 म्हशींची विक्री झाली भाव 20 ते 60 हजार रुपये, 16000 शेळ्या-मेंढ्यापैकी 12500 शेळ्या-मेंढ्यांची व 2000 बोकडांची विक्री झाली भाव 1200 ते 20 हजार रुपये जनावरांच्या बाजारात 2 कोटी 70 लाख रुपये उलाढाल झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)