कांद्याचे भाव पुन्हा कोसळले

संग्रहित छायाचित्र

चाकण- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्ड वर कांद्याची आवक वाढून भावात घट झाली. बटाट्याची आवक घटून भावामध्ये मात्र वाढ झाली. भूईमुग शेंगांची आवक घटून भाव स्थिरावले तर लसणाची आवक किरकोळीत घटून भावही घटले. एकूण उलाढाल 2 कोटी 85 लाख रुपये झाली.
कांद्याची आवक या आठवड्यात 523 क्विंटलने घटली, तर भावात 400 रुपये घट झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक 30 क्विंटलने घटली तर भावांमध्ये दोनशे रुपये वाढ होऊन भाव 2200 रुपये झाले. भुईमूग शेंगांची आवक या सप्ताहात दोन क्विंटल कमी होऊन भाव मात्र 4500 रुपयांवर स्थिरावले. लसणाची आवक या सप्ताहात तीन क्विंटलने घटली तर भावामध्ये दोनशे रुपयाने घट होऊन 1800 रुपये झाले .
चाकणमध्ये फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटून भाज्यांचे भाव मात्र वधारले. चाकण बाजारात मेथी व कोथिंबिरीचे आवक व भाव वाढले. जनावरांच्या बाजारात म्हशी आणि शेळीमेंढ्यांच्या संख्येत वाढ होऊन भावा मध्येही वाढ झाली. राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची आवक 60000 जुड्या होऊन 251 ते 1850 भाव मिळाला. कोथिंबिरीची आवक 45000 जुड्या झाली . भाव 301 ते 1401 शेपू आवक 8000 जुड्या झाली 400 ते 1150 रुपये भाव मिळाला.
शेतीमालाचे एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 1600
क्रमांक दोन : 1350
क्रमांक तीन : 800
एकूण आवक : 1128क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 2200
क्रमांक दोन : 1800
क्रमांक तीन : 1200
एकूण आवक : 565 क्विंटल
भूईमुग शेंग
क्रमांक एक : 4500
क्रमांक दोन : 4000
क्रमांक तीन : 3500
एकूण आवक : 10 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 1800
क्रमांक दोन : 1500
क्रमांक तीन : 1000
एकूण आवक : 4 क्विंटल
फळभाजी :
प्रती 100 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
हिरवी मिरची 410 (1500 ते 2500), टोमॅटो 940 (700 ते 1200), कोबी 324 (200 ते 600), फ्लॉवर 310 (700 ते 1200), वांगी 295 (3000 ते 4000), भेंडी 325 (3000 ते 4000), दोडका 270 (1500 ते 3000), कारली 315 (1500 ते 3000), दुधी भोपळा 225 (800 ते 1600), काकडी 285 (800 ते 1500), फरस बी 110 (3000 ते 4000), वालवर 205 (3000 ते 4000), गवार 80 (4000 ते 5000), ढोबळी मिरची 497 (1000 ते 2000), चवळी 140 (1000 ते 2000), वाटाणा 35 (800 ते 1000), शेवगा 70 (4000 ते 6000).
पालेभाज्या :
प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 16 हजार 425 (700 ते 1400), कोथिंबीर : एकूण आवक : 15 हजार 420 (700 ते 1200), शेपू : एकूण आवक : 4280 (500 ते 1000), पालक : एकूण आवक : 3225 (500 ते 800).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊन किंमतीही वाढल्या. विक्रीसाठी आलेल्या 140 जर्सी गाई पैकी 85 गाईची विक्री होऊन त्यांना 20 ते 50 हजार, 240 बैलां पैकी 110 बैलांची विक्री होऊन त्यांना 10 ते 30 हजार, 110 म्हशी पैकी 60 म्हशींची विक्री होऊन 20 ते 70 हजार, तर 9280 शेळ्या-मेंढ्या पैकी 8570 शेळ्या-मेढ्यांची विक्री होऊन त्यांना 1,500 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)