कांद्याचे भाव गडगडले

चाकण- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्डवर कांद्याची आवक 222 क्विंटल ने घसरली तर भाव 150 रुपयाने उतरले. तर याही आठवड्यात नवीन बटाटा आवक झाली ती 927 क्विंटलने वाढली व भाव 1620 रुपये झाले. फळभाज्यांची आवक वाढली हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, काकडी, फरस बी, वालवर, वाटाणा, शेवगा या फळभाज्यांची आवक या आठवड्यात वाढली तर भाव कमी जास्त प्रमाणत स्थिर झाले. लसूण आवक 4 क्विंटल झाली तर भावही 5 हजार रुपये झाले. भूईमुग शेंग आवक 05 पोती झाली व भाव उतरले. फळभाज्या आवक वाढली.
महात्मा फुले मार्केट यार्डवर चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 325 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 850 रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 3227 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 927 क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव 1620 रुपये झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 518 पोती झाली. भाव 2000 रुपये झाला.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 1 लाख 30 हजार जुड्यांची आवक होऊन 251 ते 1870 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 70 हजार जुड्यांची आवक होऊन 151 ते 1751 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक 30 हजार जुड्या झाली. 301 ते 751 असा जुड्यांना भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 850
क्रमांक दोन : 700
क्रमांक तीन : 400
एकूण आवक : 325 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1620
क्रमांक दोन : 1400
क्रमांक तीन : 1200
एकूण आवक : 3227 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 2000
क्रमांक दोन : 1800
क्रमांक तीन : 1500
एकूण आवक : 5 क्विंटल
भूईमुग शेंग
क्रमांक एक : 5000
क्रमांक दोन : 4000
क्रमांक तीन : 2500
एकूण आवक : 4 पोती
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 967 पेट्या (300 ते 600), कोबी : 416 पोती (400 ते 600), फ्लॉवर : 312 पोती (800 ते 1200),वांगी : 465 : पोती (1000 ते 2500), भेंडी : 380 पोती (1500 ते 2500), दोडका : 374 पोती (1000 ते 2000), कारली : 415 डाग (1000 ते 2000), दुधीभोपळा : 316 पोती (1000 ते 2000), काकडी : 140 पोती (1000 ते 2000),फरशी : 140 पोती (1000 ते 2000), वालवड : 184 पोती (2000 ते 3000), गवार : 145 पोती (1500 ते 2500), ढोबळी मिरची : 612 डाग (1000 ते 1500), चवळी : 90 पोती (1000 ते 2000), शेवगा : 102 डाग (3000 ते 4000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 9194 जुड्या (500 ते 1000), कोथिंबीर : एकूण आवक : 12565 जुड्या (300 ते 700), शेपू : एकूण आवक : 4216 जुड्या ( 300 ते 500), पालक : एकूण आवक : 3461 जुड्या (300 ते 500).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 90 जर्शी गायींपैकी 65 गाईची विक्री झाली त्यांना 20 ते 50 हजार रुपये, 525 बैलांपैकी 375 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 45 हजार रुपये, 160 म्हशींपैकी 90 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 70 हजार रुपये, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 6350 शेळ्या-मेंढ्यापैकी 5950 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 9 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 2 कोटी 75 लाख रुपये उलाढाल झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)