कांद्याचे भाव गडगडलेलेच

चाकण बाजार भाव : एकूण उलाढाल पावणेतीन कोटी

चाकण- चाकण बाजारात कांद्याची आवक घटून भावही घसरले. तर बटाटा आवक वाढून भाव घसरले. हिरवी मिरची आवक व भाव वधारले, लसूण आवकमध्ये किरकोळीत वाढ होऊन भाव स्थिरावले. भाज्यांची आवक व भावही वाढले. जनावरांच्या बाजारात किमती स्थिरावल्या जनावरांच्या बाजारात उलाढाल मंदावली. बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 85 लाख रुपये झाली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक 878 क्विंटलने घटली, भावही 500 रुपयाने घटून 1100 रुपये झाले. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 250 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1100 रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1493 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 874 क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव 700 रुपयाने घटून 1500 रुपये झाला. या आठवड्यात भूईमुग शेंगाची आवक 9 क्विंटल झाली भाव 4500 स्थिर झाले. लसणाची एकूण आवक 05 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 1 हजार 800 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 518 पोती झाली.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 55 हजार जुड्यांची आवक होऊन 251 ते 1850 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 30 हजार जुड्यांची आवक होऊन 301 ते 1401 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक 12000 जुड्या झाली. 501 ते 1201असा जुड्यांना भाव मिळाला .
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 1100
क्रमांक दोन : 1000
क्रमांक तीन : 500
एकूण आवक : 250 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1500
क्रमांक दोन : 1400
क्रमांक तीन : 1200
एकूण आवक : 1493 क्विंटल
भूईमुग शेंग
क्रमांक एक : 4500
क्रमांक दोन : 4000
क्रमांक तीन : 3500
एकूण आवक : 09 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 1800
क्रमांक दोन : 1500
क्रमांक तीन : 1000
एकूण आवक : 05 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 847 पेट्या (500 ते 1000), कोबी : 398 पोती (500 ते 800), फ्लॉवर : 367 पोती (700 ते 1200), वांगी : 295: पोती (3000 ते 4000), भेंडी : 328 पोती (2500 ते 3500), दोडका : 285 पोती (2500 ते 3500), कारली : 345 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा : 228 पोती (800 ते 1400), काकडी : 198 पोती (1000 ते 2000), फरशी : 114 पोती (3000 ते 4000), वालवड : 194 पोती (3500 ते 4500), गवार : 135 पोती (5000 ते 6000), ढोबळी मिरची : 745 डाग (1000 ते 1500), चवळी : 140 पोती (1000 ते 2000), शेवगा : 70 डाग (4000 ते 6000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 16425 जुड्या (700 ते 1400), कोथिंबीर : एकूण आवक : 15420 जुड्या (700 ते 1200), शेपू : एकूण आवक : 4280 जुड्या (500 ते 1000), पालक : एकूण आवक : 3225 जुड्या (500 ते 800).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 160 जर्शी गायींपैकी 90 गाईची विक्री झाली त्यांना 20 ते 50 हजार, 260 बैलांपैकी 135 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 30 हजार, 95 म्हशींपैकी 55 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 80 हजार, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 9600 शेळ्या-मेंढ्यापैकी 8200 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 1 कोटी 80 लाख ते 2 कोटी उलाढाल झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)