कांद्याचे भाव गडगडलेलेच

चाकण बाजारभाव : एकूण उलाढाल 2 कोटी 80 लाख

चाकण- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक 10 क्विंटलने घटली, तर भावही 100 रुपयाने घसरून 1000 रुपये झाले. याही आठवड्यात बटाटा आवक वाढून भाव मात्र 300 रुपयाने उतरले, हिरवी मिरची,टोमॅटो, कोबी,
फ्लॉवर, वांगी, दोडका, काकडी, कारली, चवळी या भाज्यांची आवक या आठवड्यात कमी झाली, तर भाव कमी जास्त प्रमाणात वाढले. भूईमुग शेंग आवक वाढून भाव 5300 रुपयांवर आले. लसूण आवकमध्ये किरकोळ वाढ झाली तर भाव वाढले. तर भाज्यांची आवक वाढली व भाव वाढले. जनावरांच्या बाजारात उलाढाल मंदावली, बाजारात एकूण उलाढाल 2 कोटी 80 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 1240 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1000 रुपयांवर आला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 2383 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 919 क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव 200 रुपयाने घटून 1600 रुपये झाला. या सप्तहात भूईमुग शेंगाची आवक 8 क्विंटल झाली भाव 5300 स्थिर झाले. लसणाची एकूण आवक 07 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 436 पोती झाली.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 90 हजार जुड्यांची आवक होऊन 251 ते 1251 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 45 हजार जुड्यांची आवक होऊन 351 ते 1501 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक 15000 जुड्या झाली. 401 ते 851 असा जुड्यांना भाव मिळाला.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव क्विंटलमध्ये
कांदा
क्रमांक एक : 1000
क्रमांक दोन : 700
क्रमांक तीन : 400
एकूण आवक 1240 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1600
क्रमांक दोन : 1200
क्रमांक तीन : 700
एकूण आवक 2383 क्विंटल
भूईमुग शेंग
क्रमांक एक : 5300
क्रमांक दोन : 4500
क्रमांक तीन : 3000
एकूण आवक 8 क्विंटल
लसूण
कांदा
क्रमांक एक : 2000
क्रमांक दोन : 1500
क्रमांक तीन : 1000
एकूण आवक : 7 क्विंटल
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागाना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 845 पेट्या (500 ते 1000), कोबी : 391 पोती (200 ते 600), फ्लॉवर : 358 पोती (400 ते 1000), वांगी : 418 पोती (1000 ते 2000), भेंडी : 451 पोती (2000 ते 3500), दोडका : 345 पोती (2000 ते 3000), कारली : 318 डाग (1500 ते 2500), दुधीभोपळा : 218 पोती (6000 ते 1400), काकडी : 384 पोती
(1500 ते 2500), फरशी : 123 पोती (3000 ते 4000), वालवड : 204 पोती (2500 ते 3500), गवार : 142 पोती (4000 ते 5000), ढोबळी मिरची : 419 डाग (1500 ते 2500), चवळी : 191 पोती
(2000 ते 3000), शेवगा : 132 डाग (4000 ते 5000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांमध्ये)
मेथी : एकूण आवक : 19284 जुड्या (500 ते 900), कोथिंबीर : एकूण आवक : 24532 जुड्या (600 ते 1000), शेपू : एकूण आवक : 3945 जुड्या (300 ते 500), पालक : एकूण आवक : 5647 जुड्या (200 ते 400).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 145 जर्शी गायींपैकी 110 गाईची विक्री झाली त्यांना 10 ते 40 हजार, 225 बैलांपैकी 170 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 25 हजार, 140 म्हशींपैकी 115 म्हशींची विक्री झाली त्यांना 20 ते 70 हजार, शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 8350 शेळ्या-मेंढ्यापैकी 7860 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 2 कोटी रुपये उलाढाल झाली


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)